‘आधी जग नियम बनवायचं, आपण पाळायचो; आता आपण नियम बनवतो’

नवी दिल्ली : आधी जग नियम बनवायचे आणि आपण ते पाळायचो. मात्र, आता आपणच नियम बनवत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीच्या पदार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. यावेळी ‘टीव्ही 9′ ग्रुपचे प्रमुख रवीप्रकाश हेही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही […]

‘आधी जग नियम बनवायचं, आपण पाळायचो; आता आपण नियम बनवतो’
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : आधी जग नियम बनवायचे आणि आपण ते पाळायचो. मात्र, आता आपणच नियम बनवत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीच्या पदार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. यावेळी ‘टीव्ही 9′ ग्रुपचे प्रमुख रवीप्रकाश हेही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 भारतवर्षला सदिच्छा देतानाच विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच मोदी सरकारच्या अनेक कामांची यादी सांगितली.

टीव्ही 9 भारतवर्षने आपल्या नव्या टीममध्ये भारतभरातील प्रतिनिधींना स्थान दिल्याच्या निर्णयाचे कौतुक करताना मोदींनी आपल्या सरकाच्याही कामांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘ टीव्ही 9 भारतवर्षचा हा निर्णय प्रशंसनीय आहे. दिल्लीतून चालणाऱ्या गोष्टींमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. मागील 5 वर्षांत आमच्या सरकारनेही अशाच प्रकारे प्रयत्न केले. आम्ही विज्ञान भवन आणि विकास भवनमधून बाहेर पडून राज्यांमध्ये गेलो. याआधी सर्व काही विज्ञान भवनमधून चालायचे.’

जगातील कोणताही राष्ट्राध्यक्ष आला की तो दिल्लीत यायचा. सर्व काही दिल्लीतून चालायचे. आम्ही उज्ज्वला योजना उत्तर प्रदेशमधील बलिया येथून सुरु केली. हँडीक्राफ्ट योजना चेन्नईमधून, आगरामधून आवास योजना, बेटी बचाओ हरियाणामधून सुरु केली. देशातील असं एकही राज्य नसेल जेथे भारत सरकारने महत्वपूर्ण काम केलं नाही. सर्व काही दिल्ली नाही. यामागे एक विचार होता. ज्याप्रकारे सरकारला सीमित करण्यात आले होते, त्याला आता तोडावे लागेल.

आज जग आपल्यासोबत आहे

‘आमच्या सरकारने मागील 5 वर्षात ज्या विचाराने काम केले, ते सर्व देशाने अनुभवले आहे. भारताचे जगातील स्थान आधी किती होते आणि आज कोठे आहे याची तुम्ही तुलना करु शकता. त्यावरुन अनेक गोष्टी स्पष्ट होतील. आधी आपण काहीही केले की जगभरातून प्रश्न उत्तरे सुरु व्हायची. जगातील इतर देश नियम बनवायचे आणि आपण ते पाळायचो. आज जगाचे नियम बनवण्यात आपल्या देशाची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरण, दहशतवाद, भ्रष्टाचार किंवा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. आज स्वरक्षणासाठी सीमेपार जाऊन दहशतवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून मारले. त्यावेळी सर्व जग आपल्या बाजूने उभे राहिले’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी 5 वर्षापूर्वी असे घडत होते का? असाही प्रश्न विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  • राष्ट्रहितासाठी जे निर्णय गरजेचे आहेत, ते कुठल्याही दबावाविना घेण्याचं काम मी केलं
  • अंतराळातील कामांसाठी मोठी गुंतवणूक आम्ही केली
  • कन्फ्युजन नव्हे, कमिटमेंटसोबत काम करत आहोत
  • काळ्या पैशाविरोधात एसआयटी बनवण्यासाठी आधीचं सरकार 3 वर्षे टाळत राहिलं, मात्र आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला
  • गेल्या 5 वर्षात आम्ही बँकिंग घोटाळे रोखण्याचे प्रयत्न केले
  • देशात घोटाळा करुन परदेशात पळून जाणाऱ्यांची आज काय स्थिती आहे? हे देश पाहतोय
  • देशात 9 हजार कोटींचा घोटाळा करुन परदेशात पळालेल्याची 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली
  • 8 कोटींची मलाई बंद होईल म्हणून आधारच्या अनिवार्यतेला विरोध सुरु झाला होता
  • विरोधी पक्षांना आणि दिल्लीत एसीत बसलेल्यांना देशातील ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे, हेच माहित नाही
  • भ्रष्टाचारविरोधी लढाई आपण जिंकू शकतो
  • देशात स्वच्छता निर्माण होऊ शकते, यावर देशाला विश्वास बसला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘राष्ट्रीय संमेलना’तील संपूर्ण भाषण पाहा :

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.