पीएमसी बँकेवर निर्बंध, प्रसिद्ध अभिनेत्रीवर सोनं विकण्याची वेळ

पीएमसी बँकेने ग्राहकांवर निर्बंध जारी केल्यानंतर टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार हिला सोनं विकून उदरनिर्वाह करावा लागत आहे

पीएमसी बँकेवर निर्बंध, प्रसिद्ध अभिनेत्रीवर सोनं विकण्याची वेळ
Follow us
| Updated on: Oct 10, 2019 | 9:12 AM

मुंबई : रिझर्व्ह बँकेने ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’ला नोटीस पाठवून निर्बंध जारी केल्यानंतर अनेक ग्राहकांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत आहे. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार (Nupur Alankar) हिच्यावरही बिकट परिस्थिती ओढावली आहे. सोनं विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्याचं नुपूरने (PMC Bank Crisis effect on Actress) सांगितलं.

अभिनेत्री नुपूर अलंकार ही ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ या हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली होती. मात्र 24 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेला नोटीस जारी केली. सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पीएमसी बँक कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ग्राहक आपल्या खात्यातून सहा महिन्यांत केवळ 25 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकतात.

नुपूरचे अकाऊंटही पीएमसी बँकेत असल्यामुळे तिला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. आयुष्यभराची पुंजी मी या बँकेत जमा केली होती. कठीण प्रसंगात आपल्यावर 50 हजार रुपयांचं कर्ज झाल्याचं तिने माध्यमांना सांगितलं. रोजच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला सोन्याचे दागिने विकावे (PMC Bank Crisis effect on Actress) लागल्याचंही नुपूरने सांगितलं.

नुपूरने अगले जनम मोहे बिटिया ही किजो, स्वरांगिनी, फुलवा, दिया और बाती हम यासारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

पीएमसी बँकेवरील निर्बंध

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली आहे. हे दोघे एचडीआयएल (HDIL) कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही आरोपींच्या जवळपास 3 हजार 500 कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

पीएमसी बँकेने ग्राहकांना एसएमएस पाठवून निर्बंधांविषयी माहिती दिल्यानंतर पीएमसी बँकेतून पैसे काढण्यासाठी शाखांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. सुरुवातीला आरबीआयने ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांपर्यंत नेण्यात आली. आता ही रक्कम 25 हजारांवर नेण्यात आली आहे. 25 हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता. पण 6 महिन्यातून केवळ 25 हजार रुपयेच काढता येतील.

Non Stop LIVE Update
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.