जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली गुटख्याची तस्करी, पालघरमध्ये 15 लाखांचा गुटखा जप्त

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Gutkha smuggling palghar) आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली गुटख्याची तस्करी, पालघरमध्ये 15 लाखांचा गुटखा जप्त

पालघर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Gutkha smuggling palghar) आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण याच लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही लोक गुटख्याची तस्करी करत असल्याचे पालघर येथे समोर आले आहे. पालघर सातवली येथे एका ट्रकचा अपघात झाला. अपघात झाल्याने ट्रक पलटी झाला असता ट्रकमध्ये भाज्यांसह 15 लाख रुपयांचा गुटखा मिळाला (Gutkha smuggling palghar) आहे.

हा ट्रक गुजरातवरुन महाराष्ट्रात येत होता. यावेळी हा अपघात झाला आहे. अपघातानंतर चालक फरार असून पोलिसांनी ट्रक मालकावर गुन्हा दाखल केला आहे. जीवनावश्य वस्तूंच्या नावाखाली गुटखा तस्करी करत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली. मात्र याचा गैरफायदा घेत मोठ्याप्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे असल्याचं समोर आलं आहे.

पालघर पोलिसांनी 15 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 35 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

संबंधित बातम्या :

‘मी शपथ घेतो की..’, संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांसाठी पालघर पोलिसांकडून शपथ

वसई, विरार आणि पालघरमध्ये सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल बंद, फक्त अत्यावश्यक वाहनांना पेट्रोल मिळणार


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI