वसई, विरार आणि पालघरमध्ये सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल बंद, फक्त अत्यावश्यक वाहनांना पेट्रोल मिळणार

वसई, विरार आणि पालघरमध्ये सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल बंद, फक्त अत्यावश्यक वाहनांना पेट्रोल मिळणार

वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला (Petrol Diesel  Limit Palghar) आहे.

Namrata Patil

|

Apr 09, 2020 | 11:59 AM

पालघर : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात (Petrol Diesel  Limit Palghar) आहे. मात्र तरीही अनेक जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागण्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल विक्री बंद ठेवण्याचा घेतला आहे.

अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या वाहनांच्या रांगा (Petrol Diesel  Limit Palghar) लागत आहे. यातील काही वाहनांवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. तरीही अनावश्यकपणे फिरण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे या परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहने सोडून इतरांसाठी पेट्रोल डिझेल विक्री बंद करण्यात येणार आहे.

पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी 8 मार्च रोजी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार आत्यावशक सेवा वगळता अन्य कुणालाही पेट्रोल डीझेल न देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत सर्वसामान्यांना पेट्रोल डीझेल विक्री शहरात बंद राहणार आहे.

वसई विरार परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहेत. तसेच शहरातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल डीझेल भरण्यासाठी मोठ गर्दी होत त्यामुळे शहरात कोरोन विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला (Petrol Diesel  Limit Palghar) आहे.

राज्यात कोरोनाचे 1135 रुग्ण

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,135 वर येऊन पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत 748 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला (Kem Doctor Corona Positive) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें