AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day LIVE | वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान : मोदी

देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा (73rd Independence Day) उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन सकाळी ध्वजारोहण केलं.

Independence Day LIVE |  वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान : मोदी
| Updated on: Aug 15, 2019 | 9:06 AM
Share

73rd Independence Day नवी दिल्ली : देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा (73rd Independence Day) उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन सकाळी ध्वजारोहण केलं. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी ‘मेरा देश बदल रहा है’ म्हणत केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीवरही भाष्य केलं. देशवासियांमधील निराशेचं मळभ दूर झालं आहे. पुढील 5 वर्षात देशवासियांचं स्वप्न पूर्ण करु, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन मोदींनी दिलं.

LIVE UPDATE

काही देश केवळ भारतालाच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना दहशतवादाने उद्ध्वस्त करत आहे. बांगलादेश आणि श्रीलंकाही दहशतवादाचा सामना करत आहेत – मोदी

चीफ ऑफ डिफेन्स

शेजारी देशाला आमच्या सैनिकांची ताकद माहित आहे. आम्ही लाल किल्ल्यावरुन निर्णय घेतला आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स’ हे पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तिन्ही सुरक्षा दलांच्या समन्वयासाठी नेमणूक करणार आहे.

प्लॉस्टिकमुक्त भारत

2 ऑक्टोबरपासून प्लॉस्टिकमुक्त भारताचं काम करु. 2 ऑक्टोबरला संपूर्ण देशाने प्लॅस्टिक गोळा करुन भारत प्लॅस्टिकमुक्त करावा. प्लास्टिकमुक्तीसाठी अभियान सुरु करणं गरजेचं, दुकानांमध्ये प्लास्टिक पिशवी न मागण्याचा बोर्ड लावावा – मोदी

पर्यटन विकासावर भर

लघु उद्योगांना चालना द्यावी लागेल. पर्यटन विकासावर भर देण्याची गरज आहे. देशाच्या कामासाठी अवघड काम करावंच लागेल. अर्थव्यवस्था 3 ट्रिलीयनवरुन, 5 ट्रिलीयन पर्यंत आपण गेलो.

विकासला अडसर ठरणाऱ्यांची हकालपट्टी

पूर्वी वीजेचा खांब आला तर लोक वीज येणार म्हणून खूश होते होते. पण आता जनता विचारते की 24 तास वीज कधी?. आधी रस्ता कधी होणार विचार होते, आता विचारतात चौपदरी, सहापदरी रस्ता कधी होणार. लोकांच्या अपेक्षा वाढत आहे, ते आवश्यक आहे. विकासला अडसर ठरणाऱ्या लोकांची हकालपट्टी करण्यात आली.

बांगलादेशला शुभेच्छा, पाकिस्तानवर टीका

लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी पाकिस्तानवर टीका. शेजारी देश बांगलादेश , श्रीलंका हे सुद्धा दहशतवादाविरोधात लढत आहेत. श्रीलंकेत झालेला हल्ला वेदनादायक होता. आपल्या शेजारच्या बांगलादेशाला 4 दिवसांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान – मोदी

सध्या आपल्या देशाची वाटचाल ज्या स्थितीतून जात आहे, त्या स्थितीत राजकीय फायदे तोटे पाहून निर्णय घेतले जाऊ नयेत. लोकसंख्येचा विस्फोट होत आहे. या विस्फोटामुळे आपल्या येणाऱ्या पिढीसमोर नवी संकटं उभी होत आहेत. देशात एक जागरुक वर्ग आहे, तो याबाबतची चिंता जाणून आहे.  एक छोटा वर्ग आहे जो ही समस्या समजत आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मापूर्वीच ते त्याच्या भविष्याचा विचार करतात. आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे विचार करायला हवा. आपल्या घरात बाळाला जन्म देण्यापूर्वी त्याच्या गरजांची पूर्तता करु शकेल की नाही याचा विचार करा – मोदी

मी दररोज एक कायदा रद्द केला, आतापर्यंत 1450 कायदे रद्द केले आहेत, ही स्वतंत्र भारताची आवश्यकता होती : पंतप्रधान  मोदी

भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला गरिबी मुक्त व्हायचं आहे. गेल्या 5 वर्षात गरिबी हटवण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली. गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्यात अनेक प्रयत्नांना यश आलं.

देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. जगात आपला दबदबा निर्माण करायचा आहे. त्यासाठी आधी आपल्या देशातील गरिबी हटवायची आहे, पण ते कोणावरही उपकार म्हणून नव्हे – मोदी

जीएसटीमुळे एक देश एक टॅक्स संकल्पना आणली. ऊर्जा क्षेत्रात एक देश एक ग्रीड, वन देश, एक गतिशीलता, यानंतर आता एक देश एक निवडणूक ही संकल्पना साकार झाली.

जर 2014 ते 2019 हा गरजांच्या पूर्ततेचा कालखंड होता, तर 2019 चा कालखंड देशवासियांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ततेचा कालखंड असेल, त्यांची स्वप्न साकार करण्याचा कालखंड असेल – नरेंद्र मोदी

आपल्या देशात डॉक्टरांची मोठी गरज आहे. आरोग्य सोई सुविधांची आवश्यकता आहे. त्या पूर्ण करण्यासाठी नव्या कायद्यांची गरज आहे. त्यामुळे नव्या सरकारने अनेक महत्त्वाचे कायदे केले – पंतप्रधान

कलम 370 रद्द करुन सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले. एक देश एक निवडणूक व्हायला हवी. देशाला गरिबीमुक्त करावं लागेल. आजही अनेक भागात पाणी मिळत नाही. आजही पाण्यासाठी 3 ते 5 किलोमीटरवरची पायपीट करावी लागते. –

माझ्यासाठी राजकारण नाही तर देश महत्त्वाचा आहे. आज संपूर्ण देश म्हणत एक देश एक संविधान – नरेंद्र मोदी

सगळ्या पक्षांनी 370 कलम रद्द करण्याबाबत पाठिंबा दिला. काही पक्षांनी यावर राजकारण केले. इतकी वर्षे तुमच्या हातात सत्ता होती मग तुम्ही 370 कलम रद्द का केले नाही?  – नरेंध्र मोदी

जम्मू काश्मीर, लडाखचा विकास करणार. तिथल्या नागरिकांचा विकास करणार. त्यांच्यावर 70 वर्ष अन्याय झाला. जम्मू काश्मीरचा सामान्य नागरिकही आता दिल्ली सरकारला विचारु शकेल – मोदी

गेल्या 70 वर्षात जे काम जमलं नाही ते आम्ही काम केले.  संसदेच्या दोन्ही सभागृहात आम्ही 370 कलम रद्द केलं.

नवीन सरकारने केवळ दहा आठवडे पूर्ण केले, मात्र कमी कालावधीत प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची पावलं उचलली गेली. Article 370 आणि 35A हटवणं हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल आहे : पंतप्रधान मोदी

आरोग्य व्यवस्था लोकाभिमुख केल्या, जलसंवर्धनाचं महत्त्व जाणून जलशक्ति मंत्रालयाची स्थापना : पंतप्रधान मोदी

आपण स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना देशभराच्या विविध भागातील नागरिकांना महापुराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत : पंतप्रधान मोदी

तीन तलाकवरुन मुस्लिम महिलांमध्ये भिती निर्माण झाली होती. सगळ्या मुस्लिम देशांनी तिहेरी तलाकवर बंदी घातली. आम्ही पण सती बंदी, हुंडाबंदी निर्णय घेतले होते, मग मुस्लिम बघिणींसाठी तिहेरी तलाकबंदीचा निर्णय घ्यावा लागला – नरेंद्र मोदी

10 आठवड्यात  कलम 370 रद्द करुन, सरदार वल्लभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले. मुस्लिम बहिणींची तिहेरी तलाकमधून सुटका केली. आपल्या देशाला डॉक्टरांची गरज आहे. मेडीकल शिक्षणासाठी कायदा अंमलात आणला

‘सबका साथ सबका विकास’मुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलो, त्यामुळे सबका विश्वासही मिळाला. कोणताही नेते यावेळी निवडणूक लढवत नव्हते तर देश निवडणूक लढवत होते. – नरेंद्र मोदी

2014 ते 2019 मला देशसेवा करण्याची संधी दिली. आमचे काम आता आणखी वेगाने करणार. देशाला पुढे नेण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत आहे. देशामध्ये निराशा होती पण 2014 पासून फक्त देशासाठी काम केले. देशाची निराशा आशामध्ये बदली – मोदी

देशासाठी शहिद झालेल्या सर्वांना नमन करतो, रक्षाबंधनच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा : नरेंद्र मोदी

देशभरात उत्साह

स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारी इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सहाव्यांदा लाल किल्यावरून देशवासियांना संबोधित केलं.अभूतपूर्व बहुमत मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदींचं लाल किल्यावरचं हे पहिलंच भाषण आहे. माजी पंतप्रधान, भाजपचे दिवंगत अटलबिहारी वाजपेयींनंतर लाल किल्यावरून सलग सहाव्यांदा भाषण करणारे मोदी हे भाजपचे दुसरे नेते ठरले.

आजच्या भाषणात मोदी 370बद्दल काय बोलणार? पाक व्याप्त काश्मीर, बलुचिस्तान या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का? शिवाय देशवासियांना काय संदेश देणार याकडे देखील देशवासियाचं लक्ष लागून राहिलं होतं.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी साडे आठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण करण्यात येत आहे. त्यानंतर 9 वाजून 5 मिनिटांनी मंत्रालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री  भाग घेणार आहेत. तर साडे नऊला मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मुंबई शहरात 40 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आली आहेत.  देशातील प्रमुख शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.