VIDEO : बॅकलेस साडीमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा चर्चेत

या शूटमध्ये तिने सोनेरी रंगाची साडी घातली होती. या साडीवर तिने ब्लाऊज घातला नसल्याने तिची संपूर्ण पाठ उघडी दिसत होती.

  • Updated On - 1:24 pm, Mon, 7 December 20 Edited By: नम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
VIDEO : बॅकलेस साडीमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा चर्चेत
(Photo : @priyankachopra)

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा आपल्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. प्रियांकाने अमेरिकेच्या प्रसिद्ध इनस्टाइल मॅगझीनसाठी एक शूट केलं आहे. या शूटमध्ये तिने सोनेरी रंगाची साडी घातली होती. या साडीवर तिने ब्लाऊज घातला नसल्याने तिची संपूर्ण पाठ उघडी दिसत होती. दरम्यान तिच्या या लूकनंतर काहींनी तिचे कौतुक केले आहे, तर काहींनी मात्र तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

वाचा :   ‘मेट गाला’मध्ये प्रियांकाचा ‘चोली के पीछे’ गाण्यावर डान्स

लूक, फॅशन, दिलखेचक अदा आणि नजरांच्या जोरावर चाहत्यांना प्रेमात पाडायला लावणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचं कौतुक केलं जातं. भारतासह अमेरिकेतही प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावताना प्रियांका कपडे, स्टाईल सर्व अभिनेत्रींपेक्षा अगदी हटके असते. त्यामुळे अनेकजण तिला स्टाईल आयकॉन समजतात.

नुकतंच प्रियांकाने अमेरिकेच्या एका प्रसिद्ध मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट केलं. या फोटोत प्रियांकाने सोनेरी रंगाची साडी घातली होती. ही साडी फॅशन डिझायनर तरुण तहलियानी यांनी डिझाईन केली होती. दरम्यान या साडीत तिने ब्लाऊज न घालता बॅकलेस पोज दिली. या फोटोशूटचे काही फोटो तिने इनस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले.

तिच्या या पोस्टनंतर काही जणांनी तिला छान, सुंदर, मस्त अशा कमेंट दिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला काही नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केल आहे. तिच्या एका चाहत्यांनी तू भारतीय आहे, हे तु विसरते आहेस, तर काहींनी तुला हे कपडे घालताना लाज कशी वाटली नाही असा प्रश्न विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाला पती निक जोन्स याच्या फोटोमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. त्याआधी प्रियांका मेट गाला या कार्यक्रमातील लूकमुळे ट्रोल झाली होती.

संबंधित बातम्या 

नवऱ्यासोबतच्या फोटोंमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा ट्रोल, बाहुबलीशी तुलना  

PHOTO : प्रियांका आणि निकचे आतापर्यंतचे सर्वात रोमँटिक फोटो  

लग्नानंतर सहा महिन्यातच गरोदर असल्याची चर्चा, प्रियांका चोप्रा म्हणते….