AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची शोकांतिका! पु. ल. देशपांडेंच्या बायोपिकलाच थिएटर मिळेना

मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व भाई अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाची जादू सगळ्यांनाच परिचित आहे. पण पुलंच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाला प्रदर्शनासाठी झगडावं लागतंय. या चित्रपटाला मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रात स्क्रीन आणि प्राईमटाईमच उपलब्ध नसल्याचा सूर थिएटर चालकांनी आवळलाय. रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या सिंबाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. ‘सिम्बा’च्या […]

महाराष्ट्राची शोकांतिका! पु. ल. देशपांडेंच्या बायोपिकलाच थिएटर मिळेना
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व भाई अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाची जादू सगळ्यांनाच परिचित आहे. पण पुलंच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाला प्रदर्शनासाठी झगडावं लागतंय. या चित्रपटाला मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रात स्क्रीन आणि प्राईमटाईमच उपलब्ध नसल्याचा सूर थिएटर चालकांनी आवळलाय.

रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या सिंबाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. ‘सिम्बा’च्या वितरकांचा दबाव चित्रपटगृहांच्या मालकांवर येत असून त्यामुळे अनेकांनी ‘भाई’ चित्रपट दाखवण्यास नकार दिलाय. वितरकांच्या दबावामुळे थिएटर मालक कोंडीत सापडल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे महाराष्ट्रातच चित्रपट निर्मात्यांना ‘कोणी थिएटर देता का थिएटर’असं म्हणण्याची वेळ आली आहे.

भाई चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर या सगळ्या प्रकरणाने प्रचंड संतापले आहेत. नेहमीच मराठी चित्रपटांची गळचेपी का केली जाते? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक कलाकृती येत असताना त्याचे स्वागत व्हायला हवे. विद्येच्या माहेरघरात अर्थात पुण्यात तर पुलंचं दीर्घकाळ वास्तव्य होतं. तिथेही त्यांच्यावरच्या सिनेमाला स्क्रीन्स मिळू नये ही लाज वाटण्याची बाब आहे. पुलंच्या महाराष्ट्रात त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झाली आहे. सध्याच्या घडीचं हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल.

मुंबई-पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरातील स्क्रीन मालकांनी हा चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे. पुलंचा या दोन्ही शहरांशी खास ऋणानुबंध जोडला होता. मात्र असं असताना त्यांच्या बायोपिकला एका हिंदी चित्रपटासाठी स्क्रीन देण्यास नकार दिला जातो हे वास्तव तमाम मराठी प्रेक्षकांसाठी अत्यंत निराशाजनक आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडेच्या चित्रपटाला थिएटर मिळण्यासाठी झगडावं लागत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही बऱ्याचदा मोठा चित्रपट असेल तर मराठी चित्रपटांना डावलण्यात आलंय. ‘भाई’सोबतच प्रदर्शित होत असलेल्या ‘पाटील’ या चित्रपटाचीही अशीच शोकांतिका आहे. पुरेसे थिएटर उपलब्ध होत नसल्यामुळे निर्माते हा चित्रपट तिसऱ्यांदा प्रदर्शित करत आहेत. आधी ठग्ज ऑफ हिंदोस्तान आणि आता ‘सिम्बा’चा फटका याही चित्रपटाला बसलाय. त्यामुळे महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची गळचेपी का होते असा सवाल पाटील चित्रपटातील कलाकारांनी उपस्थित केला आहे.

प्रत्येक वेळी मराठी चित्रपटांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. आता तर सिम्बा विरुद्ध ‘भाई’चा हा संघर्ष पेटण्याची अजून शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत भाईचे निर्माता काय तोडगा काढतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

भाई सिनेमाचा ट्रेलर :

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.