अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यासाठी लोकांची उत्सुकता, सफेमाकडून 17 संपत्तीचा लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा सफेमाकडून लिलाव होणार आहे (Property of Dawood Ibrahim will be auctioned off).

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यासाठी लोकांची उत्सुकता, सफेमाकडून 17 संपत्तीचा लिलाव

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा सफेमा म्हणजेच स्मगलर फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर अ‍ॅक्ट अंतर्गत (SAFEMA act) लिलाव होणार आहे. सफेमाकडून दाऊदच्या 17 मालमत्तेच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. ही संपत्ती दाऊदच्या मुळ गाव कोकणातील आहे. या संपत्तीला खरेदी करण्यासाठी अनेकांनी उत्सूकता दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Property of Dawood Ibrahim will be auctioned off).

दाऊदची संपत्ती विकत घेण्यास लोकांची उत्सुकता दर्शवली आहे. सफेमाकडून दाऊदच्या एकूण 17 मालमत्तेचा लिलाव होणार आहे. त्यापैकी 7 मालमत्तेचा लवकरच लिलाव होणार आहे. दाऊदच्या संपत्तीची आज (2 नोव्हेंबर) सफेमाकडून पाहणी झाली. या पाहणीत 7 मालमत्ता ही दाऊदची आहेत. तर एक मालमत्ता कुख्यात तस्कर इकबाल मिर्ची याची आहे (Property of Dawood Ibrahim will be auctioned off).

दाऊदच्या संपत्तीचा तीन प्रकारे लिलाव होणार आहे. इ टेंडर, टेंडर आणि प्रत्यक्ष पब्लिक ओकॅशन याद्वारे संपत्तीचा लिलाव होणार आहे. दाऊदची मालमत्ता खरेदी करु इच्छुक 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे.

रत्नागिरीतील खेडमध्ये असणाऱ्या मुंबके गावात मोस्ट वॉन्टेड आरोपी दाऊदचा बंगला आहे. तीन मजली असलेला हा बंगला दाऊदची आई अमिना आणि बहीण हसीना पारकर यांच्या नावे आहे. याशिवाय दाऊदच्या मुंबके गावात विविध ठिकाणी जमिनी आहेत. या सर्व मालमत्तांची खरेदी गुन्हेगारी पैशातून करण्यात आली आहे.

खेड गावात दाऊदचा बंगला

खेडमध्ये असणारा तीन मजली अलिशान बंगला हा दाऊदच्या बहिणीच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता त्याची आई अमिना बी च्या नावे आहेत. सध्या दाऊदचे संपूर्ण कुटूंब मुंबईतील पाकमोडीया स्ट्रीटवर फॅल्टमध्ये राहतात. मात्र दाऊदचे कुटूंब 1980 दरम्यान खेडच्या बंगल्यात राहायचे. त्यानंतर 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आलं नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भितींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षापासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहे. असं असलं तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.

मुंबके गावात दाऊद इब्राहिमचे कुटुंब सुमारे 40 दशकांपूर्वी वास्तव्य करीत होते. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांना जेव्हा मुंबई पोलिसात नोकरी मिळाली तेव्हा ते आपल्या कुटूंबासह मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटमध्ये स्थायिक झाला. दाऊदही मुंबईला स्थायिक झाला.

दाऊदने मुंबईत गुन्हेगारी जगात आपले पाऊल ठेवले. बाकीचे कुटुंब मुंबईत गेले तरीही दाऊदच्या चार बहिणींपैकी एक बहीण बरेच वर्षे येथे राहिली. तिच्या मृत्यूनंतर दाऊदचं घर ओसाड पडलं. तस्करीच्या आरोपावरुन फरारी घोषित झाल्यानंतर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

सफेमा कायद्यांतर्गत दाऊद इब्राहिम आणि तस्कर इकबाल मिर्ची यांच्या जप्त केलेल्या मालमतेचा 10 नोव्हेंबरला लिलाव होणार आहे. त्यातील सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक म्हणजे त्याचा बंगला. 30 गुंठे जमिनीवर पसरलेल्या या बंगल्याचे राखीव मूल्य 5 लाख 35 हजार 800 रुपये ठेवण्यात आले आहे. बोली लावणाऱ्यांना 1 लाख 35 हजार रुपये स्टेटमेंट द्यावे लागेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI