अतिवृष्टीमुळे पुण्यात पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुण्यात 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या (Pune heavy rain) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच, अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुण्यातील पाच जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी (27 सप्टेंबर) सुट्टी जाहीर केली आहे

अतिवृष्टीमुळे पुण्यात पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 9:00 AM

पुणे : पुण्यात 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या (Pune heavy rain) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच, अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुण्यातील पाच जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी (27 सप्टेंबर) सुट्टी जाहीर केली आहे (Holiday Declare in Pune).

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे (Pune Schools).

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

पुण्यात अतिवृष्टीमुळे 14 मृत्यू, 9 अद्याप बेपत्ता

मुसळधार पावसाने पुण्यातील 14 जणांचा बळी घेतला, तर नऊ जण अजूनही बेपत्ता आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांना फटका बसला. शहरासह ग्रामीण भागातील सखल भागातील घरात पाणी शिरलं होतं. या परिस्थितीनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पूरग्रस्तांना (Pune heavy rain flood) सुरक्षितस्थळी हलवलं आणि मदतीसाठी एनडीआरएफची पाच पथकं कार्यरत झाली. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष असून सर्व मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

गेल्या 22 वर्षात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात धरणं भरली असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. तुलनेने रात्री झालेला पाऊस किती तरी जास्त होता. यावर्षी जिल्ह्यात 180 टक्के पाऊस झाला आहे. बुधवारच्या पावसामुळे जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू झाला, ज्यात पुणे शहरातील सहा, हवेली तालुक्यातील सहा आणि पुरंदर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील मुसळधार पावसाने 14 जणांचा मृत्यू, 9 जण अजूनही बेपत्ता

Pune Rain Live Update | पुण्यात पावसाचा कहर, मृतांचा आकडा 13 वर

ढगफुटी नाही, मग पुण्यातील पावसाचं नेमकं कारण काय?

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.