AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढगफुटी नाही, मग पुण्यातील पावसाचं नेमकं कारण काय?

गेले दोन दिवस ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’मुळे पाऊस पडत आहे. अशा ढगांमुळे एका तासात 100 मिमी म्हणजेच ढगफुटीसारखे प्रकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याला ढगफुटी म्हणणं चुकीचं आहे.

ढगफुटी नाही, मग पुण्यातील पावसाचं नेमकं कारण काय?
| Updated on: Sep 26, 2019 | 8:40 AM
Share

पुणे : दिवसा वाढलेल्या तापमानामुळे होणारं बाष्पीभवन आणि स्थानिक पातळीवरील वातावरणातील बदल या कारणांमुळे अचानक ढगनिर्मिती होऊन पुण्यात जोरदार पाऊस पडत असल्याची माहिती आहे. अशा ढगांना ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ (Pune Rain Cumulonimbus Cloud) म्हटलं जातं. या पावसाला ढगफुटी म्हणणं चुकीचं आहे.

पुण्यात गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ (Pune Rain Cumulonimbus Cloud) म्हणजे नेमकं काय?

वरच्या दिशेने जाणाऱ्या पाणीदार ढगांना ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ म्हटलं जातं. पुणे शहरात दिवसाच्या तापमान वाढ झाली आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढून ढगांची निर्मिती होते. या ढगाची उंची दोन ते 15 किलोमीटर, तर लांबी किंवा व्याप्ती पाच ते दहा किमी परिसराइतकी असते.

जमिनीवरील तापमान जास्त असल्याने खालून हवा वर जात असते. हवेच्या दाबामुळे पाणीदार ढगांची निर्मिती होऊ लागते. याउलट संध्याकाळी तापमान कमी झाल्यामुळे खालच्या स्तरावरील हवेचा दाब कमी होतो.

पाणीदार ढगांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बाष्प साठतं की, त्यांचं वस्तुमान वाढून ते वेगाने खाली यायला लागतात. अशावेळी मोठ्या-टपोऱ्या थेंबासारखा जोरदार पाऊस पडू लागतो. हा पाऊस जास्तीत जास्त दोन तास पडतो.

गेले दोन दिवस ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’मुळे पाऊस पडत आहे. अशा ढगांमुळे एका तासात 100 मिमी म्हणजेच ढगफुटीसारखे प्रकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याला ढगफुटी म्हणणं चुकीचं आहे.

पावसाचा हाहाःकार

पुण्यात काल (बुधवारी) रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ (Pune City Heavy Rains) घातला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील बरेचसे रस्ते जलमय झाले असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. अरणेश्वर भागात पाच जणांचे मृतदेह आढळले असून तीन ते चार जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर सिंहगड परिसरात कारमध्ये एकाचा मृतदेह आढळला.

अरणेश्वर, टांगेवाली कॉलनी परिसरात दोन महिला, पुरुष आणि एका लहान मुलाचा मृतदेह आढळला आहे. 13 वर्षीय रोहित भरत आमले, 55 वर्षीय संतोष कदम, 32 वर्षीय सौंदलीकर (महिला) आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. तर सिंहगड परिसरात कारमध्ये दत्तात्रय गिरमे यांचा मृतदेह आढळला.

पुण्यातील पावसाचे अपडेट्स

पुण्यात काल रात्री आठ वाजल्यापासून पावसाने जोर धरला. मुसळधार पावसामुळे (Pune City Heavy Rains) शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. रस्त्यावरच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी काळजी करु नये आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असं आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे.

शाळांना सु्ट्टी जाहीर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

स्विफ्ट आणि रिक्षावर झाड कोसळलं

शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकामध्ये मुसळधार पावसामध्ये स्विफ्ट आणि एका रिक्षावर झाड पडून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती ठीक आहे. जखमींना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.