Pune Corona : पुण्यात 24 तासात 6 कोरोना बळी, मृतांचा आकडा 92 वर

पुणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 92 वर येऊन पोहोचली आहे.

Pune Corona : पुण्यात 24 तासात 6 कोरोना बळी, मृतांचा आकडा 92 वर
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 1:32 AM

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Pune Corona Death Update) चालला आहे. लॉकडाऊनचा कालावधील वाढवूनही राज्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यातच राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. राज्यात आतापर्यंत 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची (Pune Corona Death Update) संख्या 92 वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणूमुळे पुणे जिल्ह्यात गुरुवारी (30 एप्रिल) तब्बल 105 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1700 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 92 वर गेला.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पुणे शहराच्या हद्दीत चार रुग्णांचा मृत्यू झाला. दोन मृत्यू हे पुण्याबाहेरील आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 85 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

पुण्यात कुठे किती कोरोनाग्रस्तांचा मृत्यू?

– कसबा पेठेतील 40 वर्षीय महिलेचा सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातील नायडू रुग्णालयात या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनासह इतर व्याधी असल्यानं मृत्यू झाल्याची माहिती.

– पर्वती दर्शन परिसरातील 47 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनासह इतर व्याधी असल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. (Pune Corona Death Update)

– भवानी पेठेतील 53 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा काल मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. या रुग्णाला कोरोनासह इतर व्याधीही होत्या.

– रविवार पेठेतील 58 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  कोरोनासह या महिलेला इतरही व्याधी होत्या.

– मार्केटयार्ड परिसरातील 66 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोना इतर व्याधी होत्या.

– कोंढवा परिसरातील 76 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ही महिला मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. आज सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाचे 10 हजार 498 रुग्ण

महाराष्ट्रात आज (30 एप्रिल) दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 498 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे. तर पुण्यातील रुग्णांची संख्यादेखील तब्बल 1200 च्या पार गेली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. महाराष्ट्रात आज 180 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 हजार 773 रुग्ण कोरोनातून (Pune Corona Death Update) बरे झाले आहेत.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनचं उल्लंघन, ठाण्याहून 30 कामगार विनापरवाना पालघरमध्ये, ठेकेदारावर गुन्हा दाखल

देशातील 8,324 रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या 33 हजारांवर : आरोग्य मंत्रालय

Pune Corona Update : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी लर्निंग फ्रॉम होम, शासनाकडून ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.