Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पाच दिवसांवरुन 10 दिवसांवर

पुण्यात आता रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे. मार्च महिन्यात हा कालावधी पाच दिवसांवर होता.

Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पाच दिवसांवरुन 10 दिवसांवर

पुणे : पुणेकरांसाठी दिलासा देणारी (Pune Corona Patients Growth Rate) बातमी आहे. पुण्यात आता रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे. मार्च महिन्यात हा कालावधी पाच दिवसांवर होता. तर, एप्रिल महिन्यात सात दिवसांत रुग्ण दुप्पट होत होते, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड (Pune Corona Patients Growth Rate) यांनी दिली.

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, पुण्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दुप्पटीने वाढणे हे सकारात्मक आहे. मार्टच महिन्यात पाच दिवसात कोरोनाचे रुग्ण दुप्पट व्हायचे तर एप्रिलमध्ये हा कालावधी सात दिवसांवर गेला. मात्र, मे महिन्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा दहा दिवसांवर गेला आहे.

शिवाय, 31 मेपर्यंत पुण्यात 9 हजार 600 कोरोनाबाधित रुग्ण असतील तर आणि 11 हजार निगेटिव्ह रुग्ण असतील. त्यामुळे तब्बल वीस हजार रुग्णांचं नियोजन असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं.

शहरातील 90 टक्के रुग्ण हे दाट झोपडपट्टीतील आहेत. 274 पैकी 69 झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव इथेच नियंत्रित करणं गरजेचे आहे. या माध्यमातून कोरोनावर मात केली जाऊ शकते. त्याचबरोबर बेरोजगार, हातावर पोट असणारे आणि छोट्या व्यावसायिकांमध्येही असंतोष आहे. त्यामुळे सध्या तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं आयुक्तांनी (Pune Corona Patients Growth Rate) सांगितलं.

कोरोनाला रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनीही काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुकानात मास्क असणाऱ्या ग्राहकांना परवानगी देणे, दुकानातील फ्लोअर वारंवार सॅनिटाईझ करणे, दुकानात हॅण्डवॉश, वॉश बेसिनची व्यवस्था करण्याचं आवाहन आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यातील व्यावसायिकांनी केलं आहे.

पुण्यात 99 नवे रुग्ण, आकडा 2,245 वर

पुण्यात आज 99 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात सध्या 2,245 कोरोना रुग्ण आहेत. पुणे मनपा हद्दीत काल सात वाजल्यापासून आतापर्यंत तब्बल 11 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागात एका कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच आज जिल्ह्यात एकूण 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत 136 रुग्णांचा मृत्यू तर जिल्ह्यात 147 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात 61 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 732 रुग्णांना डिस्चार्ज (Pune Corona Patients Growth Rate) मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Lockdown | पुणे छावणी परिसर 2 दिवस पूर्ण लॉकडाऊन, मेडिकल वगळता सर्व बंद

पुण्यात दारुच्या 107 दुकानांना पुन्हा टाळे

Pune Corona | कोरोनामुक्त बाळंतीण 21 दिवसांनी घरी, दोन वृद्धांचीही मात

Positive News : पुण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, नऊ दिवसात 411 रुग्णांना डिस्चार्ज

Published On - 12:35 am, Sat, 9 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI