पुणे जिल्ह्यात दिवसभरात 125 नवे कोरोनाबाधित, आठ रुग्णांचा बळी

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 'कोरोना'मुळे प्राण गमवावे लागलेल्या रुग्णांचा आकडा 156 वर गेला आहे. (Pune Corona Patients Increased)

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 125 नवे कोरोनाबाधित, आठ रुग्णांचा बळी

पुणे : पुणे जिल्ह्यात काल (रविवार 10 मे) दिवसभरात तब्बल 125 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 हजार 857 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. (Pune Corona Patients Increased)

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागलेल्या रुग्णांचा आकडा 156 वर गेला आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 202 रुग्णांना डिस्चार्जही मिळाला. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 1139 झाली आहे.

दरम्यान, पुणे शहरात रविवारी दिवसभरात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबळी 145 झाले आहेत. दिवसभरात पुण्यात 102 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2482 वर पोहचली आहे.

हेही वाचा : पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे शहरात रविवारी दिवसभरात सर्वाधिक म्हणजे 194 रुग्ण डिस्चार्ज झाले. एका दिवसात कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. आतापर्यंत हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात तब्बल 1020 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. दुसरीकडे, 92 रुग्ण क्रिटिकल असून सतरा कोरोनाग्रस्त व्हेंटिलेटरवर आहेत.

मुंबईत काय स्थिती?

मुंबईत काल 875 नव्या रुग्णांची भर मुंबईत रुग्णसंख्या 13 हजार 564 वर मुंबईत रविवारी 19 रुग्णांचा मृत्यू मुंबईत कोरोनाबळींचा आकडा 508 वर मुंबईत 3 हजार 4 रुग्ण कोरोनामुक्त

(Pune Corona Patients Increased)

राज्याची आकडेवारी

महाराष्ट्रात काल कोरोनाचे सर्वाधिक 53 बळी राज्यातील कोरोनाबळींची संख्या 832 वर रविवारी महाराष्ट्रात 1278 नव्या रुग्णांची भर राज्यात 22 हजार 171 रुग्णांची नोंद 4 हजार 199 रुग्ण कोरोनामुक्त

(Pune Corona Patients Increased)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI