पुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी!, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही

सागर जोशी

|

Updated on: Oct 28, 2020 | 4:41 PM

पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होत्या. पण आता पुणेकर आणि जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पुणे जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त झाली आहेत. तर 205 गावांमध्ये कोरोनाची शिरकावच झाला नसल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी!, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही

पुणे: कोरोनाच्या संकटात पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल 502 गावं पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत. तर अडीचशे गावांमध्ये कोरोनाचा शिरकावच झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्यातील आकडेवारी पाहता ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 13 हजार अॅक्टिव रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.( Pune district corona update 502 villages are Corona free)

पुणे शहरातही करोनामुक्तीचं प्रमाण वाढलं

पुण्यात कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणात मोठी वाढ होत आहे. बुधवारपर्यंत पुण्यात 5 हजार 427 बाधित रुग्ण होते. आतापर्यंत 2 हजार 875 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 596 अंकांनी (Pune Corona Patients Discharged) जास्त आहे. 15 क्षत्रिय कार्यालयांपैकी पाच विभागात रुग्ण डिस्चार्ज होण्याच प्रमाणही जास्त आहे. कंटेनमेंट क्षेत्रातच बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. ढोले पाटील रस्ता इथं सर्वाधिक तब्बल 562 रुग्ण बरे झाले आहेत.

कालच्या आकडेवारीनुसार कुठे किती रुग्ण बरे?

  • येरवडा धानोरी -344
  • नगर रोड वडगाव शेरी -81
  • वानवडी रामटेकडी -126
  • हडपसर मुंढवा- 61
  • कोंढवा येवलेवाडी- 43
  • बिबवेवाडी- 148
  • भवानी पेठ -495
  • ढोले पाटील -562
  • कसबा विश्रामबाग- 327
  • शिवाजीनगर घोले रोड 340
  • औंध बाणेर -6
  • कोथरूड बावधन-13
  • वारजे कर्वेनगर-18
  • सिंहगड रोड -17
  • धनकवडी सहकारनगर -137

पुणे महापालिकेचा ‘मिशन झिरो’ उपक्रम

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं मिशन झिरो उपक्रम हाती घेतला होता. मालेगाव आणि धारावीमध्ये मिशन झिरो उपक्रमक यशस्वी ठरल्यानंतर पुण्यातही तो राबवण्यात आला. महापालिकेनं भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याही हा उपक्रमक राबवला.

संबंधित बातम्या:

Pune Corona | पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 3556 जणांचा कोरोनाने मृत्यू, वाढत्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढवली

Pune Corona : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा ‘मिशन झिरो’ उपक्रम

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन

Pune district corona update 502 villages are Corona free

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI