Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहतील (Pune Lockdown Guidelines declared by municipal commissioner Vikram Kumar).

Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 13 जुलै ते 23 जुलैदरम्यान असेल. पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी काल (12 जुलै) पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली (Pune Lockdown Guidelines declared by municipal commissioner Vikram Kumar).

पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. दरम्यान, 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय दहा दिवस हॉटेल्स आणि लाँजदेखील बंद राहणार आहेत. पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत (Pune Lockdown Guidelines declared by municipal commissioner Vikram Kumar).

  • पुण्यात दहा दिवस सर्व सलून दुकानं, स्पॉ, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील.
  • 14 ते 18 जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील.
  • तर 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहतील.
  • मटन, चिकन, अंडी यांची विक्री 14 ते 18 जुलै या पाच दिवसात पूर्णपणे बंद राहील.
  • त्यानंतर पुढचे पाच दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मटन, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील.
  • पुण्यात 13 ते 23 जुलै या दहा दिवसात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद राहतील.

पुण्यात काय सुरु काय बंद?

Published On - 4:30 pm, Sun, 12 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI