पुण्यात तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 1500 तर 15 मेपर्यंत 3 हजार होण्याची शक्यता : आयुक्त

पुण्यात पुढच्या तीन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 1,500 वर तर 15 मेपर्यंत 3,000 वर जाण्याशी शक्यता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तवली आहे (Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad).

पुण्यात तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 1500 तर 15 मेपर्यंत 3 हजार होण्याची शक्यता : आयुक्त
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 8:32 PM

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे (Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad). पुण्यात पुढच्या तीन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 1,500 वर तर 15 मेपर्यंत 3,000 वर जाण्याशी शक्यता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तवली आहे. मात्र, तरीही इतर शहरांच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. मॅथेमॅटिक मॉडेलप्रमाणे अपेक्षित तेवढे रुग्ण वाढलेले नाहीत, असं आयुक्त म्हणाले (Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad).

“कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजनादेखील केल्या जात आहेत. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कुटुंबातील किमान सहा सदस्य बाधित धरले जातात. तर फर्स्ट कॉन्टॅक्टमधील 10 ते 12 जणांची कोरोना तपासणी केली जाते”, अशी माहिती शेखर गायकवाड यांनी दिली.

“दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयांशी करार केला जात आहे. गेल्या आठवड्यात भारती रुग्णालयासोबत 150 आणि सिम्बॉयसिस रुग्णालयासोबत 500 बेड्सचा करार करण्यात आला होता. या आठवड्यात दीनानाथ आणि सह्याद्री रुग्णांलयांसोबत तर पुढच्या आठवड्यात पुणे स्टेशनला 150 बेडचा करार केला जाणार आहे. सीओईपी हॉस्टेलमध्ये 800 बेड्सचं रुग्णालय तयार करण्याचा विचार आहे. आता सध्या 14 खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण आहेत”, असं आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.

“रुग्णांची संख्या वाढणार असल्याने 74 हॉस्टेल अधिग्रहित करण्यात आले आहेत. आपली 43 हजारांची क्षमता असून 300 शाळांमध्ये ही व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आणखी 20 हजार नागरिकांची सोय होईल”, असेही आयुक्तांनी सांगितलं. “सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये 2200 रुम, बालेवाडीचा निकमारला 1100 रुम उपलब्ध आहेत. झोपडपट्टीतल्या नागरिकांना 14 दिवस इन्स्टिट्यूटशनल राहायला सांगतले आहे”, असंदेखील आयुक्तांनी सांगितलं.

पुण्यातील रुग्णसंख्या वाढतीच

पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 934 वर गेली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत एकूण 171 रुग्ण आढळले आहेत. (Corona Hot spot Pune Ward wise Patients)

पुण्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत 32 रुग्ण तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत 21 रुग्ण वाढले. एकूण मृतांचा आकडा 59 वर गेला आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 2 (0) कोथरुड – बावधन – 1 (0) वारजे – कर्वेनगर –9 (+1) सिंहगड रोड – 9 (+1) शिवाजीनगर – घोलेरोड – 77 (+18) कसबा – विश्रामबाग वाडा –111 (+9) धनकवडी – सहकारनगर – 43 (+5) (Corona Hot spot Pune Ward wise Patients) भवानी पेठ – 171 (+3) बिबवेवाडी – 24 (0) ढोले पाटील रोड – 110 (+13) कोंढवा – येवलेवाडी – 12 (+2) येरवडा – धानोरी – 82 (+14) नगर रोड – वडगाव शेरी – 18 (+2) वानवडी – रामटेकडी – 34 (+2) हडपसर – मुंढवा – 26 (0) पुण्याबाहेरील – 39 (+2)

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल, चंद्रकांत पाटलांचा दावा

जामखेडमध्ये 11 रुग्ण ऐकून माझं मन सुन्न झालं, रात्रभर झोप आली नाही : राम शिंदे

नगरमध्ये 4 निगेटिव्ह रुग्णांची कोरोना चाचणी 14 दिवासांनी पॉझिटिव्ह

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.