पुण्यातील ताडी विक्रेत्याचं गुजरातपर्यंत कनेक्शन, उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. स्थानिक कारवाईचे धागेदोरे थेट गुजरातमध्ये लागल्याने थेट कंपनीच सील करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील ताडी विक्रेत्याचं गुजरातपर्यंत कनेक्शन, उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

पुणे : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. स्थानिक कारवाईचे धागेदोरे थेट गुजरातमध्ये लागल्याने थेट कंपनीच सील करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्याने अनधिकृत मद्य विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. (Pune Palm wine seller Connection to Gujarat; excise department’s big action)

पुण्यात ताडी निर्मिती करणाऱ्यावर कारवाई करत असताना त्याचं गुजरात कनेक्शन समोर आलं होतं. गुजरात येथील वळसाडमधील एक कारखाना स्थानिक कारवाईत सहभागी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट गुजरातमध्ये संबंधित कारखाना सील करत कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान साडेतीन लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक संतोष झगडे यांनी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या :

नशेबाजीसाठी नवनवीन क्लुप्त्या; शितपेयामध्ये औषध टाकून नशा

मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या, बापाची पोलिसांसमोर कबुली

लिकर किंग अतुल मदन प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत!, अवैध मद्यसाठा विखे-पाटलांच्या कारखान्यातून आल्याचा संशय

(Pune Palm wine seller Connection to Gujarat; excise department’s big action)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI