लिकर किंग अतुल मदन प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत!, अवैध मद्यसाठा विखे-पाटलांच्या कारखान्यातून आल्याचा संशय

नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला दारु साठा आणि विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यातील दारुचे नमुने यात साधर्म्य आढळल्यास उत्पादन शुल्क विभाग विखे पाटील कारखान्याच्या मालकांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लिकर किंग अतुल मदन प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत!, अवैध मद्यसाठा विखे-पाटलांच्या कारखान्यातून आल्याचा संशय
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 3:56 PM

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या नाशिकचा लिकर किंग अतुल मदन प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केला होता. हा मद्यसाठा लिकर किंग अतुल मदनच्या वाईन शॉपमध्ये जात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अतुल मदन याचे नाशिकमधील 14 वाईनशॉप सील करण्यात आले होते. हा मद्यसाठा विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातून आल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाला आहे. (Radhakrishna Vikhe Patil likely to get into trouble in Atul Madan case)

उत्पादन शुल्क विभागाच्या संशयानुसार आता विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातील दारुचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला दारु साठा आणि विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यातील दारुचे नमुने यात साधर्म्य आढळल्यास उत्पादन शुल्क विभाग विखे पाटील कारखान्याच्या मालकांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे भाजपचे मोठे नेते गिरीश महाजन यांचं नाव नाशिकच्या बीएचआर घोटाळ्यात आलं आहे. तर आता अवैध मद्यसाठा प्रकरणी विखे पाटील यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे भाजपचे दोन मोठे नेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अतुल मदन प्रकरण काय आहे?

लिकर किंग अतुल मदनचे शहरातील तब्बल 14 दारु दुकानं सील केल्यानंतरही त्याला अटक न केल्याने शहरात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. काही दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्यसाठा करणारा ट्रक पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक हद्दीत पशू खाद्याच्या ट्रकमधून जाणारा अवैध मद्यसाठा पकडला होता. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा हा मद्यसाठा शहरातील एकाच दारु दुकान मालकाच्या दुकानांमध्ये जात होता. नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईने अवैध मद्यविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन लिकर किंग अतुल मदनच्या मालकीच्या 14 दारु दुकानांना सील करत धडक कारवाई केली होती. एकीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई केलेली असताना, उत्पादन शुल्क विभाग अतुल मदन यांच्याकडून खुलासा आल्यानंतर अटक करु, अशा डिफेनसिव्ह मोडमध्ये का आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चौकशी करुन कारवाई करु- भुजबळ

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बीएचआर आणि अतुल मदन प्रकरणाची चौकशी करुन, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं म्हटलंय.

संबंधित बातम्या:

दारुची 14 दुकानं सील तरीही नाशिकच्या लिकर किंगला अटक नाही; एक्साईज विभागाच्या भूमिकेवरुन उलटसुलट चर्चा

Radhakrishna Vikhe Patil likely to get into trouble in Atul Madan case

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.