Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

पुणे पोलिसांनी शहरात पाच ठिकाणी कर्फ्यू (Pune police enforce curfew) जाहीर केला आहे. आज सायंकाळी सात वाजल्यापासून 14 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू असेल.

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाने (Pune police enforce curfew) आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांनी शहरात पाच ठिकाणी कर्फ्यू (Pune police enforce curfew) जाहीर केला आहे. आज सायंकाळी सात वाजल्यापासून 14 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या पाचही भागात नागरिकांच्या संचाराला पूर्णपणे बंदी असेल.

मंगळवार पेठ, रविवार पेठ, गाडीतळ, स्वारगेट आणि कोंढवा या 5 परिसरात हा कर्फ्यू असेल.

फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार पेठ आणि रविवार पेठ, खडक पोलिस ठाण्यांतर्गत गाडीतळ, तर स्वारगेट परिसर आणि कोंढवा परिसरात कर्फ्यू असेल. पुण्यातील काही भाग सील केल्यानंतर आता पाच भागात कर्फ्यू लावल्याने, इथे नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही.

या भागातील फक्त जीवनावश्यक घटक वगळता, या भागातील दुकाने फक्त दोन तास सुरु राहतील. गर्दी वाढली तर दुकाने बंद करण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे दुकानं कधी उघडी ठेवायची याची वेळ पोलीस ठरवणार आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1018 महाराष्ट्रात कोरोनाने गुणाकार सुरु केला आहे. कारण आज एकाच दिवसात तब्बल 150 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 1018 इतकी झाली आहे. मुंबईत आज 116 तर पुणे जिल्ह्यात तब्बल 18 नवे रुग्ण आढळले.

Published On - 7:59 pm, Tue, 7 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI