पुण्यातील 102 पोलीस चौकीचं काम पोलीस ठाण्यातून चालणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

पुण्यातील 102 पोलीस चौकीचं काम पोलीस ठाण्यातून चालणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

पुणे पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील तब्बल 102 पोलीस चौकीचं काम पोलीस ठाण्यातून सुरु राहणार आहे.

Nupur Chilkulwar

|

Apr 28, 2020 | 3:55 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे (Pune Police Update). दररोज कोरोनो रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील तब्बल 102 पोलीस चौकीचं काम पोलीस ठाण्यातून (Pune Police Update) सुरु राहणार आहे.

पुण्यात आता पोलीस चौकीऐवजी पोलीस ठाण्यातून कायदा-सुव्यवस्था राखणार आहेत. शहरातील 102 पोलीस चौकीचं काम तात्पुरते थांबवून पोलीस ठाण्यातून काम सुरु राहणार आहे. जे काम आतापर्यंत पोलीस चौकीतून होत होतं. ते काम आता पोलीस ठाण्यातून होणार आहे. तसेही पोलीस चौकीतील पोलीस नाकाबंदीत व्यस्त असल्याने चौकीत पोलिसांची संख्या कमी आहे.

एखादी घटना घडली की मोठ्या संख्येने नागरिक पोलीस चौकीत जमा होतात. त्यामुळे सोशल डिस्टन्स मेंटेन राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि डायबेटिससह इतर आजार असलेल्या पोलिसांना नाकाबंदी आणि फिल्डवरची ड्युटी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नाकाबंदीचं काम न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पोलिसांना पोलीस ठाण्यातील कार्यालयीन काम (Pune Police Update) दिले जाणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर साधारण 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. काही पोलिसांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यांना हॉटेलमध्ये विलगीकरण करुन कामकाज सुरु करण्यात आलं आहे.

55 वर्षांपेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश : मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई पोलिस दलातील तिघा हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अत्यंत तातडीची पावलं टाकली आहेत. 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांचं वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तामध्ये सहभागी होऊ नये, अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत (Pune Police Update).

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाचा वाढता कहर

मास्क लावण्यास सांगितल्याचा राग, सीआरपीएफ जवानाचा पोलिसांवर हल्ला

पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

पुणे विभागातील 230 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 1457 वर : विभागीय आयुक्त

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें