राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत, मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात

ससून रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर आजार होते (Pune sees Maximum Death Rate of corona patients in Maharashtra)

राज्यातील सर्वाधिक 'कोरोना'बळी मुंबईत, मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात
अनिश बेंद्रे

|

Apr 17, 2020 | 8:03 AM

पुणे : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर अद्यापही सर्वाधिक आहे. राज्यातील मृत्यूदर 6.41 टक्के आहे, परंतु पुण्यातील ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यूदर दहा टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत गेले असले, तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक मृत्यू पुण्यात आहेत. (Pune sees Maximum Death Rate of corona patients in Maharashtra)

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात एका दिवसात 69 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 506 वर गेली आहे, तर 47 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यानंतर राज्यात सर्वाधिक म्हणजे 9.3 टक्के मृत्यूदर पुण्यात असल्याचं दिसून येतं.

नवे रुग्ण आढळण्याचा वेग मुंबईत सर्वाधिक असला, तरी मृत्यूदर पुण्याच्या तुलनेत कमी आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत एकूण 111 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर 6.3 टक्के राहिला आहे

ससून रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर आजार किंवा शस्त्रक्रिया झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली आहे. चंदनवाले यांच्यावर तडकाफडकी कारवाई करुन उपअधिष्ठाता डॉ. तांबे यांच्याकडे कारभार सुपूर्द करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयामध्ये गेल्या पंधरा दिवसात 38 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, हे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे.

मृत्यूचा अभ्यास करण्यासंदर्भात टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. चंदनवाले यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सहसंचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी होती.

मॉर्निंग वॉकची हौस फिटेना

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र अशाही परिस्थितीत अनेक पुणेकर ‘मॉर्निंग वॉक’ करतात.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा पुणेकरांवर कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवण्यात आला. यावेळी तब्बल 1284 वाहने जप्त करण्यात आली तर कलम 188 अंतर्गत 482 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचारबंदीच्या काळात आतापर्यंत पोलिसांनी 6 हजार 452 नागरिकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, तर वीस हजारपेक्षा जास्त नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तब्बल 23 हजार वाहनं जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सुरु राहणार असल्यामुळे अजून आकडा वाढणार आहे.

कोरोनाबाधित भागातील रुग्णांची तपासणी वाढल्याने संख्याही वाढली आहे. बाधित क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी होत आहे. भवानी पेठ परिसरातील रुग्णसंख्या शंभरीच्या घरात आहे.

महाराष्ट्राच्या आकड्यांवर नजर

-महाराष्ट्रात काल 286 नव्या रुग्णांची भर -राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 3202 वर -महाराष्ट्रात मृत्त्यू घटले, काल 7 बळींची नोंद -राज्यातल्या एकूण बळींची संख्या 197 -राज्यात आतापर्यंत 300 रुग्ण बरे होऊन घरी

मुंबईत सहा दिवसात दुप्पट रुग्ण

– मुंबईत काल एका दिवसातले सर्वाधिक 177 नवे रुग्ण – मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 2073 वर – सहा दिवसात मुंबईत दुप्पट रुग्ण वाढले – मुंबईत काल तिघांचा मृत्यू, एकूण ‘कोरोना’बळी 117

इंदोर बनले हॉटस्पॉट

-भारतात कोरोनाचे रुग्ण 13 हजार 500 हून जास्त -काल देशभर 1,261 नव्या रुग्णांची भर -मध्य प्रदेशात सर्वाधिक 361 रुग्णांची नोंद – इंदोर बनले हॉटस्पॉट, काल 244 नवे रुग्ण

(Pune sees Maximum Death Rate of corona patients in Maharashtra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें