Raigad corona update : रायगडमध्ये 24 तासात 38 नवे रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 518 वर

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 38 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, (Raigad corona update) पनवेल महानगरपालिका हद्दीतील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Raigad corona update : रायगडमध्ये 24 तासात 38 नवे रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 518 वर
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 12:58 PM

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 38 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, (Raigad corona update) पनवेल महानगरपालिका हद्दीतील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 518 झाली आहे. यातील 161 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 18 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये पनवेल मनपा 8, पनवेल ग्रामीण 3, पोलादपूर 1, महाड 3, कर्जत 1, खालापूर 1, मुरुड 1 रुग्णांचा समावेश आहे. तर सद्यस्थितीत पॉझिटीव्ह असलेल्या 339 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये पनवेल मनपातील 136, पनवेल ग्रामीणमधील 77, उरणमधील 119, अलिबाग 2, खालापूर 1, पेण 1, माणगाव 1, तळा 1, महाड 1 रुग्णाचा समावेश आहे.  (Raigad corona update)

उरण तालुक्यात आणखी 16 कोरोना रुग्ण सापडले उरण तालुक्यातील करंजा, सुरकीचापाडा, कासवलेपाडा, कोंढरीपाडा, नवापाडा या गावांमध्ये 16 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे उरण तालुक्यात एकूण कोरोना बधितांची संख्या 126 झाली आहे. यामधील 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 119 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पनवेल महानगर पालिका हद्दीत 13 तर ग्रामीणमध्ये 9 कोरोनाबधित सापडले पनवेल महापालिका हद्दीत रविवारी पुन्हा 13 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नवीन पनवेल 6, खारघरमध्ये 4, कामोठे 2, कळंबोली 1 रुग्णांचा समावेश आहे. रविवार अखेर पनवेल मनपा हद्दीत एकूण बाधित रुग्णांची संख्या 259 झाली आहे. यापैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 139 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तसेच रविवारी पनवेल ग्रामीणमध्ये 9 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, पनवेल ग्रमिंमधील बधीतांची संख्या 107 झाली आहे. यामधील 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 77 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

खारपाडा येथे विशेष कक्ष रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात खारपाडा मार्गे प्रवेश करणार्‍या या नागरिकांची नोंद व्हावी, यासाठी पेण तालुक्यातील खारपाडा येथे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे येथून चालत येणार्‍या किंवा वाहनातून येणार्‍या प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी नोंद घेतली जात आहे. त्यांची थर्मल स्कॅनरने तपासणीही केली जात आहे. संबंधित नागरिक कुठून आले आहेत? कुठे चालले आहेत? त्यांचा वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती नोंदवून घेतली जात आहे.

नोंद होणार्‍या प्रत्येक नागरिकाच्या हातावर ‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारल्यानंतरच त्यांना येथून पुढे सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर जे नागरिक चालत आलेले आहेत, त्यांच्यासाठी फूड पॅकेट्स आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शासनाने या चालत येणार्‍या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी बसेसची व्यवस्थाही केली आहे. त्यामुळे या चाकरमान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. 11 मे पासून साधारणतः 35 हजार नागरिकांची नोंद येथे झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे यांनी माहिती दिली आहे.

(Raigad corona update)

संबंधित बातम्या 

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर, 24 तासात 32 पॉझिटिव्ह, कुठे किती रुग्ण?

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.