Raigad Rain | रायगडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस, रोहा तालुका हाय अलर्टवर, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ

अवघ्या दोन दिवसाच्या पावसातच रायगडमधील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली.

Raigad Rain | रायगडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस, रोहा तालुका हाय अलर्टवर, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ
| Updated on: Jun 19, 2020 | 12:46 AM

रायगड : गेल्या दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात सतत पाऊस पडत (Raigad Heavy Rainfall) आहे. रायगडमध्ये कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसत आहे. पावसाळ्यात रायगड जिल्ह्याला नेहमीच पूरसदृश्य परिस्थितीला तोडं द्यावे लागते. परंतु, मान्सून जिल्ह्यात दाखल झाला आणि अवघ्या दोन दिवसाच्या पावसातच रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी  वाढ झाली (Raigad Heavy Rainfall).

त्यामुळे धोका पाहता किनाऱ्यालगतच्या गावांसाठी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. भिरा टाटा पॉवरमधून सोडलेल्या पाण्याने तयार होणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळी धोका पातळीजवळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. तसेच, अधिकारी वर्गाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

17 जून रोजी रात्री 10 वाजता केलेल्या निरीक्षणानुसार रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची धोक्याची पातळी डोलवहाल बधांऱ्यावर 23.95 मीटर ईतकी आहे. सध्याची पातळी पाणी 22.23 मीटर आहे. तर या ठिकाणी ईशारा पातळी 23.00 मीटर आहे (Raigad Heavy Rainfall).

 रायगडमधील इतर नद्यांची पाणी पातळी कितीने वाढली?

– आबां नदीची धोक्याची पातळी 9 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 7.20 मीटर आहे.

– सावित्री नदीची धोका पातळी 6.20 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 3.20 मीटर आहे.

– पाताळगंगा नदीची धोका पातळी 21.52 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 17.95 मीटर आहे.

– उल्हास नदीची धोका पातळी 48.87 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 42.60 मीटर आहे.

गाढी नदीची धोका पातळी 6.55 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 0.95 मीटर आहे.

Raigad Heavy Rainfall

संबंधित बातम्या : 

Kolhapur Rain | कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेची पातळी 23 फुटांवर, 17 बंधारे पाण्याखाली

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस