AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Rain | कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेची पातळी 23 फुटांवर, 17 बंधारे पाण्याखाली

मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे (Heavy rain in Kolhapur and West Maharashtra).

Kolhapur Rain | कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेची पातळी 23 फुटांवर, 17 बंधारे पाण्याखाली
| Updated on: Jun 17, 2020 | 1:17 PM
Share

कोल्हापूर : मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे (Heavy rain in Kolhapur and West Maharashtra). मुसळधार पावसाने पंचगगा नदीची पाणी पातळी आता 23 फुटांवर येऊन पोहचली आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात 2-3 दिवसांपासून संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगगा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर गेली आहे. त्यामुळे पंचगगा नदीचं विस्तारलेलं पात्र कोल्हापूरकरांना मागील वर्षीच्या महापूराची आठवण करुन देतंय. पहिल्याच पावसात बंधारे पाणीखाली गेल्यानं नदीकाठावरील गावांना धडकी भरली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा व सांगली जिल्ह्यात गेल्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्या मोसमातील पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचगंगा नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गेल्यावर्षी या 3 जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला होता. अलमट्टी धरणातून पाणी वेळेवर न सोडल्यामुळे शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाने जलसाठ्यांमधील पाणी पातळी वेगाने वाढत आहे. मागीलवर्षी जून आणि जुलैमध्ये अशाच मुसळधार पावसाने महापुराची स्थिती तयार झाली. याचा फटका मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी भागाला बसला. यामध्ये शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं. एकूणच कृष्णा व पंचगंगा नदीला अलमट्टी धरणामुळे महापुराची स्थिती तयार होत असते. गेल्यावर्षी अलमट्टी धरणातून पाणी वेळेवर न सोडल्यामुळे पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता.

कोल्हापूर जिल्ह्यापासून कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण 250 किलोमीटर इतके लांब आहे हे अलमट्टी धरण कृष्णा नदीच्या पात्रात बांधण्यात आले. अलमट्टी धरणातून कर्नाटक राज्याला मोठा पाणी साठा दरवर्षी केला जातो. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारने एकत्रित बसून पाणी सोडण्याचे नियोजन आत्ताच करणं आवश्यक आहे. दोन्ही सरकारने एकत्र येऊन नागरिकांना महापुरापासून दूर ठेवावे. गेल्यावर्षी 15 दिवस महापुराचा फटका बसला होता. अलमट्टी धरणातून वेळेवर पाणी न सोडल्यामुळे याचा फटका महाराष्ट्राला बसला होता. त्यामुळे यावर्षी वेळीच समन्वय समिती स्थापन करुन दोन्ही राज्यातील नेत्यांनी एकत्रित येऊन यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गेल्या वर्षी पूरग्रस्त हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणाच्या भूमिकेचा महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना दरवर्षी तोटा होतो. याचपार्श्वभूमीवर पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीवर योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस

सातारा कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, कुठे गारांचा वर्षाव, तर कुठे वादळाने झाडांची पडझड

Heavy rain in Kolhapur and West Maharashtra

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.