AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस

धबधब्यांच्या बॅक वॉटर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वेरुळ लेणीतील नर आणि मादी धबधबे आणि अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे (Aurangabad Verul Ajantha Waterfall).

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस
| Updated on: Jun 16, 2020 | 8:54 AM
Share

मुंबई : मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केल्यापासून राज्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी काहीशी विश्रांती घेऊन पावसाने दमदार हजेरी लावणं सुरुच ठेवलं आहे. औरंगाबादमध्ये तर पहिल्याच पावसात जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेण्यांजवळी धबधबे सुरु झाले आहेत. धबधब्यांच्या बॅक वॉटर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वेरुळ लेणीतील नर आणि मादी धबधबे आणि अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे (Aurangabad Verul Ajantha Waterfall). दुसरीकडे कोल्हापूर आणि बीडमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

कोल्हापूरमध्ये काल (15 जून) दिवसभराच्या विश्रांतीनंतर पावसाने आज जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. शहरासह उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरी झाल्या, तर पश्चिम भागात दमदार पाऊस पाहायला मिळाला. पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. विशेष म्हणजे पावसाने झाडं पडून फोंडाघाट-कोल्हापूर मार्ग बंद झाला आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने फोंडाघाट-पाचोबा देवस्थानाजवळ रस्त्यावर भले मोठे झाड पडले. त्यामुळे कोल्हापूरकड़े जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रात्री 1 च्या सुमारास हे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. फोंडाघाट-कणकवली आणि फोंडाघाट-कोल्हापूर वाहतूक रात्रीपासून ठप्प झाली आहे. विद्युत ताराही मोठ्या प्रमाणात तुटून पडल्या आहेत. 16 ते 18 जूनपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कालपासूनच पावसाने जोर धरला असला, तरी आज सकाळ पासून पाऊस थांबून थांबून पडत आहे. काल भुईबावडा घाटातही दरड कोसळल्याची घटना घडली.

बीड जिल्ह्यात सोमवारी (15 जून) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई, बीड, परळी आणि माजलगाव या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं. मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसतोय. त्यामुळेच आता शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केलीय. बीड तालुक्यातील नाळवंडी, जरुड, पिंपळनेर परिसरात मुसळधार सरी कोसळल्या. या पावसात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र काही प्रमाणात नुकसान झालंय. अनेकांच्या शेतात पाणी साचलं आहे. समाधानकारक बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातही पावसाने चांगलेच झोडपले. सोमवारी (15 जून) संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील धोत्रे गावात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. अख्या गावाला पाण्याचा वेढा बसला होता. दोन तास चाललेल्या पावसानं या परिसरात प्रचंड नुकसान केलं. गावातील सर्वच घरांमध्ये व शेतीत पाणी साचलं. ढग फुटीसारखा पाऊस पडल्याने गाव अगदी जलमय झालं आहे. यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेही या गावाकडे रवाना झाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra Monsoon Rain | मुंबई, पुण्यात मान्सूनची हजेरी, पुढील पाच दिवस कुठे-कुठे पावसाची शक्यता?

Nagpur Rain | पावसाळ्याआधीच नागपूर मनपा सज्ज, प्रथमच ‘इन्सिडंट रिस्पॉन्स टीम’ तैनात

Raigad Rain | रायगडच्या खोपोली, खालापूरमध्ये दमदार पाऊस

Aurangabad Verul Ajantha Waterfall

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.