Maharashtra Monsoon Rain | मुंबई, पुण्यात मान्सूनची हजेरी, पुढील पाच दिवस कुठे-कुठे पावसाची शक्यता?

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि पुण्यात मान्सून धडकला, अशीही माहिती हवामान विभागाने दिली. (Maharashtra Monsoon Rain) 

Maharashtra Monsoon Rain | मुंबई, पुण्यात मान्सूनची हजेरी, पुढील पाच दिवस कुठे-कुठे पावसाची शक्यता?

पुणे : अवघ्या चार दिवसात मान्सूनने नंदुरबार वगळता संपूर्ण राज्य व्यापलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूननं राज्य व्यापलं आहे. नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात मान्सून पसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि पुण्यात आज (14 जून) मान्सून धडकला, अशीही माहिती हवामान विभागाने दिली. (Maharashtra Monsoon Rain)

पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील पाच दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण 60 मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईत उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात पुढील पाच दिवस कोसळधार

पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 18 जूनपर्यंत सर्वदूर 75 ते 100 टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल. त्याचबरोबर या परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

काही ठिकाणी 64.5 मिलीमीटर ते 115.5 मिलीमीटर पावसाच इशारा देण्यात आला आहे. तर 15 ते 17 तारखेपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातही पावसाची शक्यता

तर मध्य महाराष्ट्रात 16 जूनपासून सर्वदूर पाऊस पडेल. त्याचबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 17 आणि 18 जूनला अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्याचबरोबर 17 जूनला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाड्यात रविवारी सर्वदूर पाऊस पडेल. मात्र सोमवारपासून पावसाचा जोर थोडासा कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याशिवाय 17 आणि 18 तारखेला पाऊस कमी होऊन हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

त्याचबरोबर विदर्भातही सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. 16 जूनला अनेक ठिकाणी पाऊस पडेल. मात्र 17-18 जूनला पाऊस कमी होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Monsoon Rain)

संबंधित बातम्या : 

राज्यात मान्सूनची जोरदार वाटचाल, पुणे, अहमदनगर, औरंगाबादसह अनेक ठिकाणी मुसळधार

Maharashtra Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, पुढील चार दिवस मुसळधार : हवामान विभाग

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *