गळीत हंगामाचा बिगुल वाजणार, स्वाभिमानीची 19 वी ऊस परिषद ठरली

2 नोव्हेंबरला शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर चालू वर्षीची 19 वी ऊस परिषद  होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांनी दिली.

गळीत हंगामाचा बिगुल वाजणार, स्वाभिमानीची 19 वी ऊस परिषद ठरली

कोल्हापूर : गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. 2 नोव्हेंबरला शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर चालू वर्षीची 19 वी ऊस परिषद  होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. (Raju Shetti Announced 19 Sugarcane parishad)

ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळमधल्या राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे आणि 19 वी उस परिषद यशस्वी करावी, असंही यानिमित्ताने शेट्टी यांनी सांगितलं.

साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना आव्हान देत शेतकऱ्यांकडून दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने बळीराजाला आता रस्त्यावरची व कायदेशीर अशा दोन्ही लढाया लढाव्या लागणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफ. आर. पी. मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं.

सध्या सरकारने सिनेमागृह , हॉटेल , रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यानीच 1 नोव्हेंबर नंतर राज्यातील लॉकडाऊन शिथील करणार असल्याचे सुतोवाच केले आहे. याच पार्श्वभुमीवर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून गेली 18 वर्षे ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरच्या उस परिषदेत ऊसदर ठरत असल्याने सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.

(Raju Shetti Announced 19 Sugarcane parishad)

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जवळपास निश्चित; राजू शेट्टींना दिलेलं वचनही पाळणार

Raju Shetti | नोव्हेंबर महिन्यात ऊस परिषद होणार : राजू शेट्टी

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

Published On - 8:35 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI