जामखेडमध्ये 11 रुग्ण ऐकून माझं मन सुन्न झालं, रात्रभर झोप आली नाही : राम शिंदे

जामखेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 11 वर पोहोचल्यामुळे भाजप नेते राम शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे (Ram Shinde grief on Corona).

जामखेडमध्ये 11 रुग्ण ऐकून माझं मन सुन्न झालं, रात्रभर झोप आली नाही : राम शिंदे
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 7:44 PM

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Ram Shinde grief on Corona). जामखेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचल्याची माहिती मिळाल्यावर माझं मन सुन्न झालं. मला रात्रभर झोप आली नाही, असं भाजप नेते आणि अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले (Ram Shinde grief on Corona).

“अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु होऊन एक महिना पूर्ण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला यशदेखील आलं. मात्र, तरीही जामखेड, अहमदनगर शहर, संगमनेर नेवासा या भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. अखेर प्रशासनाला ही ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करावे लागले”, असं राम शिंदे म्हणाले.

“जामखेडमध्ये 9 रुग्ण होते. त्यात आणखी दोन रुग्णांची भर झाल्याची माहिती मिळताच माझं मन सुन्न झालं. रात्रभर मला झोप आली नाही. ज्याप्रमाणे बारामती येथे एक रुग्ण आढळल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली त्याप्रमाणे जामखेडमध्येही भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे. शासनाने आणि प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी”, अशी विनंती राम शिंदे यांनी केली.

“अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन विशेष करुन जिल्हाधिकारी, अधिकारी, डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी या देवदुतांचे मनापासुन आभार मानतो आणि वंदन करतो. तसेच जिल्ह्यातील सर्व जनता चांगलं सहकार्य करीत आहे. यापुढेही प्रशासनला असंच सहकार्य करावं”, असं आवाहन राम शिंदे यांनी केलं.

जामखेडमध्ये 6 मेपर्यंत लॉकडाऊन

हॉटस्पॉट केंद्र असलेल्या जामखेड शहर क्षेत्रातील प्रतिबंधाची मुदत आता 6 मे, 2020 पर्यंत वाढवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळल्याने वाढ करण्यात आली. सर्व आस्थापना,दुकाने, अत्यावश्यक सेवा,वस्तू विक्री इत्यादी बंद राहणार आहे.

जामखेड येथील दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाली आहे.

नगर जिल्ह्यात जामखेड 11 तर संगमनेरमध्ये 8 कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे.

नगरमधील कोरोनाबाधित रुग्णसंख्या

  • नगर शहर – ९
  • जामखेड – ११
  • संगमनेर – ८
  • आलमगीर – ०३
  • नेवासा – ०३
  • राहाता – ०१ लोणी
  • कोपरगाव – ०१
  • आष्टी ( जि. बीड ) – ०१
  • एकूण – ३७

संबंधित बातम्या :

नगरमध्ये 4 निगेटिव्ह रुग्णांची कोरोना चाचणी 14 दिवासांनी पॉझिटिव्ह

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.