हिंदू कायद्याचा आदर करतात, म्हणून राम मंदिरास विलंब : सरसंघचालक

हिंदू कायद्याचा आदर करतात, म्हणून राम मंदिरास विलंब : सरसंघचालक

नागपूर : हिंदू समाज कायद्याचा आदर करतो म्हणून राम मंदिर निर्मितीला विलंब होत आहे, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट सुप्रीम कोर्टावर निशाणा साधला. नागपुरात विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या मागणीत आयोजित केलेल्या हुंकार रॅलीत मोहन भागवत बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील मुद्दे :

  • देशात रामाचं मंदिर बनणार नाही, मग कुणाचं बनणार?
  • राम मंदिर हा भारताच्या श्रद्धेचा विषय.
  • राम मंदिरासाठी कायदा करावा.
  • अयोध्येत राम मंदिर होतं, हे सिद्ध झालंय.
  • राम मंदिराबाबत कोर्टाकडून लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे.
  • आम्ही स्वतंत्र देशात राहतो, तरी राम मंदिरासाठी आम्हाला मागणी करावी लागते.
  • रामाचं भव्य मंदिर झालंच पाहिजे.
  • हिंदू समाज कायद्यचा आदर करतो म्हणून राम मंदिर निर्मितीला विलंब होत आहे.

 नागपुरात राम मंदिरासाठी घोषणा

रविवारी होणाऱ्या ‘हुंकार’ सभेनिमित्त शहराच्या विविध भागांत हातात भगवा झेंडा व ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देत प्रभातफेरी व रॅली काढून जनजागरण करण्यात आले. हुंकार सभेमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पूर्व नागपुरातील पारडी व अन्य भागात रॅली काढण्यात आली.

बंगळुरुतही ‘हुंकार’

श्रीराम जन्मभूमी स्थळी सोमनाथच्या धर्तीवर राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने रविवारी नागपूरसह अयोध्या आणि बेंगळुरू येथे ‘हुंकार सभा’ आयोजित केल्या होत्या.

दोन महिन्यांपासून सभेची तयारी :

विहिंपने सुमारे दोन महिन्यांपुर्वीच या सभेची करण्यास सुरवात केली होती. त्यासाठी आयोजन समितीसह विविध समित्यांची स्थापनाही केली गेली. या माध्यमातून जनजागरण आणि वातावरण निर्मिती करण्यात आली. शहरातील बहुतांश मंदिरांवर हुंकार सभेचे फलक लावून यात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. विहिंपचे नेते चंद्रकांत ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली १४६ सदस्यांची स्वागत समिती तर, संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली १११ सदस्यांची आयोजन समिती तयार करण्यात आली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI