Ratnagiri Corona | कोकणात प्रवेशापूर्वी चाकरमान्यांची तपासणी होणार, कशेडी घाटात वाहनांची गर्दी

मुंबईतील कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे चाकरमानी कोकणात निघाले आहेत. मात्र, त्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Ratnagiri Corona | कोकणात प्रवेशापूर्वी चाकरमान्यांची तपासणी होणार, कशेडी घाटात वाहनांची गर्दी

रत्नागिरी : कोकणात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक चाकरमान्यांची (Ratnagiri Corona Update) वैद्यकीय तपासणी केली जात आहे. कशेडी घाटात या चाकरमान्यांची तपासणी होणार आहे. रत्नागिरीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने हा निर्णय (Ratnagiri Corona Update) घेतला आहे.

मुंबईतील कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे चाकरमानी कोकणात निघाले आहेत. मात्र, त्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने रत्‍नागिरी जिल्‍हा प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी घाटात बंगला इथे तपासणी नाका सुरु केला आहे. त्‍याठिकाणी वाहनांच्‍या रांगा लागल्‍या आहेत.

येणाऱ्या प्रत्‍येक व्‍यक्‍तींची कागदपत्रे तपासली जात आहेत. ज्‍या वाहनांकडे पास नाही, त्‍यांना परत पाठवले जात आहे. तसेच, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात जाणाऱ्या व्‍यक्‍तींची थर्मल स्‍क्रिनिंगव्‍दारे आरोग्‍य तपासणी केली जात आहे. त्‍यामुळे या तपासणी नाक्‍यावर मोठी गर्दी होत आहे (Ratnagiri Corona Update). उन्‍हा-तान्‍हातून हे लोक उभे आहेत. यात सोशल डिस्‍टन्‍सिंगचं कुठलंही पालन केलं जात नसल्‍याचं दिसून येत आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला असला, तरी गर्दीवर नियंत्रण नसल्‍याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 24 हजार 427 वर पोहोचली आहे. राज्यात काल (12 मे) 1 हजार 026 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल 339 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 5 हजार 125 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 53 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या आता 921 झाली आहे.

Ratnagiri Corona Update

संबंधित बातम्या :

सोलापूरमध्ये 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

Curfew Violation | संचारबंदी उल्लंघन प्रकरणी एक लाख पाच हजार गुन्हे, 20 हजार जणांना बेड्या

अकोल्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, सकाळपर्यंत 18 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

पुण्यातील औद्योगिक क्षेत्र हळूहळू रुळावर, 3579 उद्योग सुरु, अडीच लाख कामगार रुजू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI