शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना अटक

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना अटक

परभणी: शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उलल्याप्रकरणी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी सचलनालय अर्थात ईडीने ही कारवाई केली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथल्या रत्नाकर गुट्टे शुगर फॅक्टरी अँड एनर्जी लिमिटेडचे संचालक असलेले रत्नाकर गुट्टे आणि त्यांचे लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड या दोघांना ईडीने अटक केली.

2017 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्जप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकऱणी आता जवळपास दोन वर्षांनी रत्नाकर गुट्टेंना अटक झाली. यापूर्वीही गंगाखेड शुगर फॅक्टरीचे संचालक रत्नाकर गुट्टे आणि त्यांचा मुलाच्या नावे अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, रत्नाकर गुट्टे आणि लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना गंगाखेड न्यायालयात हजर करण्यात आलं.

कोण आहेत रत्नाकर गुट्टे? 

  • रत्नाकर गुट्टे हे रासप नेते आहेत
  • रत्नाकर गुट्टे यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती
  • रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जातात, मात्र ते जानकर यांच्या पक्षात आहेत
  • रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणघाटचे रहिवासी आहेत
  • परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते, तिथून पुढे स्वत: कंत्राटं घेण्यास सुरुवात केली आणि बडे कंत्राटदार झाले
  • रत्नाकर गुट्टे यांची सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या माध्यमातून त्यांनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली
  • गंगाखेड शुगर या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याचा आरोप गुट्टे यांच्यावर आहे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI