AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रात्रीस खेळ..’ कुटुंबातील सदस्याचं निधन, ‘शेवंता’कडून आर्थिक मदतीचं आवाहन

ओम भाई हे आमच्या सेटवर चहा-कॉफी साठी स्पेशल होते, असं शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे

'रात्रीस खेळ..' कुटुंबातील सदस्याचं निधन, 'शेवंता'कडून आर्थिक मदतीचं आवाहन
| Updated on: Feb 11, 2020 | 11:23 AM
Share

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. नाईक कुटुंबातील अण्णा, माई, छाया, दत्ता, वत्शी यासोबतच शेवंता, चोंट्या अशा अनेक व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र मालिका यशस्वी करण्यासाठी पडद्यामागेही अनेक हात राबत आहेत. यापैकीच ‘ओम भाई’ या सदस्याचा करुण अंत (Ratris Khel Chale Serial Crew Death) झाला.

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाला ओमबीर सिंह यांच्या हातच्या चहा आणि कॉफीने सुरुवात व्हायची. ओम भाई हे आमच्या सेटवर चहा-कॉफी साठी स्पेशल होते, असं शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

ओमबीर सिंह यांनी 8 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे संध्याकाळी चार वाजता सर्वांना चहा कॉफी दिली. अचानक छातीत दुखायला लागलं म्हणून सेटवरील सहकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं. मात्र उपचार सुरु असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

ओमबीर सिंह यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या बायकोवर येऊ नये म्हणून, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील टीमने ज्याला शक्य होईल तितका निधी ओम भाई यांच्या परिवारासाठी जमा करण्याचा विचार केला आहे.

प्रेक्षकांना ओम भाई यांना निधी द्यायचा असेल, तर मी त्यांच्या मुलीच्या अकाऊंटवर जमा करावा, असं आवाहनही अपूर्वा नेमळेकरने केलं आहे.

ओमबीर सिंह युनियन बँक दीपांशी ओमबीर सिंह अकाऊंट नंबर – 569002010003891 IFSC कोड – UBIN556904

View this post on Instagram

रात्रीस खेळ चाले २ ही तुमची लाडकी मालिका , त्यातले सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाला सुरुवात व्हायची ती म्हणजे ओम भाई यांच्या हातच्या चहा आणि कॉफी ने . ओम भाई हे आमच्या सेटवर चहा कॉफी साठी स्पेशल होते. तारीख ८.२ .२०२० त्यांनी नेहमी प्रमाणे संध्याकाळी ४वाजता चहा कॉफी दिली.आणि अचानक छातीत दुखायला लागले म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं आणि उपचार सुरू असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते निधन पावले. रात्रीस खेळ चाले १ आणि २ या दोन्ही मालिकेतल्या सर्व टिमला त्यांनी तरोताजा केले.म्हणुन आम्हा सर्वांना त्यांची उणीव कायम भासत राहील.त्याच्या पश्चात पत्नी , ३ मुली आणि १मुलगा असा परिवार आहे.म्हणुन त्यांच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या बायकोवर येऊ नये म्हणून आमच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील टीमने असा विचार केला की कोणाला शक्य होईल तेवढा निधी आपण ओम भाई यांच्या परिवारासाठी जमा करु. आपणांस सांगु इच्छिते की तुम्हाला जर काही निधी द्यायचा असेल तर मी खाली त्यांच्या मुलीच्या अकाउंटची माहिती दिली आहे.आम्हाला माहिती आहे तुम्ही अवश्य मदत कराल. धन्यवाद. ? . #apurvanemlekar #shevanta #shevantaswag #shevantalovers #ratriskhelchale2 #zeemarathi #humanityhelp #spotdada #ratriskhelchale #wemissyou #chailovers #coffeelovers

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

Ratris Khel Chale Serial Crew Death

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.