अमेझॉनवरुन मोबाईल खरेदी करताय? त्याआधी ‘हे’ वाचा

धुळे : अमेझॉनवरुन मोबाईलची बुकिंग केल्यानंतर, आलेले पार्सल कटरने कापून नकली मोबाईल ठेवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयनेच हा प्रताप केल्याचे धुळे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, या चौघांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रामदयाल परमानंद मौर्या, रूपेश हरी सुपे, एजाज खलिल खान, […]

अमेझॉनवरुन मोबाईल खरेदी करताय? त्याआधी ‘हे’ वाचा
या सर्व गोष्टींची असेल आवश्यकता - डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. शाळा किंवा महाविद्यालयातील पासिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:49 PM

धुळे : अमेझॉनवरुन मोबाईलची बुकिंग केल्यानंतर, आलेले पार्सल कटरने कापून नकली मोबाईल ठेवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयनेच हा प्रताप केल्याचे धुळे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, या चौघांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रामदयाल परमानंद मौर्या, रूपेश हरी सुपे, एजाज खलिल खान, राहुल आनंद निकम असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून तब्बल दहा लाख रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले आहेत. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर येणारे पार्सल हे परस्पर मिळवत असत. यानंतर कटरच्या मदतीने खोका कापून त्यातील मोबाईल काढला जात होता. तर त्या जागी डमी किंवा चिनी मोबाईल ठेवून पार्सल पुन्हा कंपनीकडे पाठवले जात होते. शिवाय बुकिंगच्या वेळी दिलेली रक्कमही कंपनीकडून परत मागितली जात होती. यातून कंपनीची दुहेरी पद्धतीने फसवणूक करण्यात येत होती. अटकेतील या चौघांना दुपारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची कोठडीत रवानगी केली आहे.

आतापर्यंत फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मोबाईल अथवा इतर किंमती वस्तू मागवल्यावर अनेकदा मूळ वस्तूऐवजी दगड, साबण अशा गोष्टीं मिळतात आणि आपली फसवणूक केली जाते. नुकतेच बॉलीवूड स्टार सोनाक्षी सिन्हासोबतही अशीच घटना घडली होती.

दिवसेंदिवस या ऑनलाईन वेबसाईटच्या कर्मचाऱ्यांकडून अशा फसवणुकींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ग्राहकाने जास्त किंमतीचा मोबाईल ऑर्डर केला तर, तो त्या ग्राहकाच्या घरी न जाता संबधीत मोबाईल कंपनीला परत केला जात असे, त्यावेळी किंमती मोबाईलच्या बदल्यात चिनी मोबाईलला किंवा डमी मोबाईल ठेवला जात असे आणि अशा प्रकारे ग्राहकांची मोठ्या प्रकारणात फसवणूक केली जात होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें