AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार कॅमेऱ्यासह Realme चा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, 6 हजारांच्या रेंजमध्ये ढासू फीचर्स

भारतात हा फोन टेकनो स्पार्क गो 2021, लाव्हा झेड 2 मॅक्स, टेकनो स्पार्क 7 आणि रियलमी सी 21 या स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे.

शानदार कॅमेऱ्यासह Realme चा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, 6 हजारांच्या रेंजमध्ये ढासू फीचर्स
Realme C11 2021
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 8:54 PM
Share

मुंबई : Realme ने गेल्या वर्षी सी सिरीज स्मार्टफोन लॉन्च केला होता, ज्याला C11 असे नाव देण्यात आले होते. यानंतर कंपनीने भारतात रियलमी नार्झो 20 आणि रियलमी नार्झो 30 5 जी लाँच केला. या व्यतिरिक्त, कंपनीने रियलमी सब युनिट Dizo अंतर्गत 2 फीचर फोन लाँच केले आहेत, Dizo स्टार 300 आणि Dizo स्टार 500 अशी या स्मार्टफोन्सची नावं आहेत. या फोनची किंमत 1999 रुपये इतकी आहे. पण आज कंपनीने आणखी एक फोन लाँच केला आहे, जो एक बजेट फोन आहे. हा फोन सी 11 ची सेकेंड जनरेशन म्हणून सादर करण्यात आला आहे. रियलमी C11 2021 असे या स्मार्टफोनचे नाव आहे. (Realme C11 2021 launched in india, Check price, features and bank discount)

भारतात हा फोन टेकनो स्पार्क गो 2021, लाव्हा झेड 2 मॅक्स, टेकनो स्पार्क 7 आणि रियलमी सी 21 या स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमती अनुक्रमे 6699 रुपये, 7799 रुपये, 6999 रुपये आणि 7999 रुपये इतक्या आहेत. रियलमी सी 11 2021 च्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6999 रुपये इतकी आहे. हा फोन कूल ब्लू आणि कूल ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन तुम्ही रियलमी.इन आणि फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता.

फोनवर ऑफर

रियलमीसी 11 हा फोन अनेक ऑफर्ससह सादर करण्यात आला आहे. या यादीत 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील आहे, जी आपण फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर मिळवू शकता. दुसरीकडे जर तुम्ही बँक ऑफ बडोदा मास्टरकार्ड डेबिट कार्डद्वारे पेमेंट पहिलं केलत तर तुम्हाला दहा टक्के सूट मिळेल. याशिवाय तुम्ही एसबीआय मास्टरकार्ड डेबिट कार्डाद्वारे पहिला व्यवहार केल्यास तुम्हाला 5 टक्के सूट मिळेल. याशिवाय तुम्हाला इतर कार्डांवरही सूट मिळेल. या व्यतिरिक्त ग्राहक 1999 व 5999 रुपयांमध्ये गुगल नेस्ट मिनी आणि गुगल नेस्ट हब खरेदी करू शकतात.

फोनमधील फीचर्स

रियलमी C11 2021 मध्ये 6.5 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो मिनी ड्रॉप नॉचसह येतो. यामध्ये तुम्हाला 20:9 स्क्रीन ऑस्पेक्ट रेश्यो मिळेल. या फोनचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 89.5 टक्के इतका आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर UNISOC SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 1.6gGHz Arm कॉर्टेक्स A55 प्रोसेसर आर्किटेक्चरसह येतो. हा फोन अँड्रॉयड 11 आधारित रियलमी UI GO एडिशनवर काम करतो. या फोनच्या कॅमेऱ्याविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जो 1080p व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा एआय सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Vivo चा भारतीय बाजारात स्मार्टफोन लाँचिंगचा धडाका, किंमती आणि फीचर्स लीक

फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी; जाणून घ्या कारण

PHOTO | 58 लाख वेळा डाउनलोड केलेले हे अॅप्स काही मिनिटांतच उडवत होते फेसबुकचा सर्व डेटा, गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले

(Realme C11 2021 launched in india, Check price, features and bank discount)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.