गृह मंत्रालयाकडून इन्फोसिस फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने इन्फोसिस फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. परदेशातून निधी स्विकारल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनवर परदेशी निधी स्विकारताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बंगळुरु येथील इन्फोसिस फाऊंडेशनवर केलेल्या कारवाईला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. इन्फोसिस फाऊंडेशनला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, “आम्ही स्वतः गृहमंत्रालयाकडे परदेशी निधी नियंत्रण […]

गृह मंत्रालयाकडून इन्फोसिस फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने इन्फोसिस फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. परदेशातून निधी स्विकारल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनवर परदेशी निधी स्विकारताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बंगळुरु येथील इन्फोसिस फाऊंडेशनवर केलेल्या कारवाईला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. इन्फोसिस फाऊंडेशनला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, “आम्ही स्वतः गृहमंत्रालयाकडे परदेशी निधी नियंत्रण कायद्यानुसार (एफसीआरए) संस्थेचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतरच गृहमंत्रालयाने ही कारवाई केली. 1996 पासून शिक्षा, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, कला आणि संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये इन्फोसिस फाऊंडेशन काम करत आहे. फाऊंडेशचे जन संपर्क अधिकारी ऋषि बसू यांनी सांगितले, 2016 मध्ये एफसीआरएमध्ये बदल करण्यात आल्यानंतर आमची संस्था या नियमाच्या कक्षेत बसत नाही.

1 हजार 755 एनजीओंना नोटीस

गृहमंत्रालयाने मागील वर्षी 1 हजार 755 संस्थांना (एनजीओ) नोटीस पाठवली होती. त्यात इन्फोसिसचाही समावेश होता. बसू यांनी सांगितले, की “आम्ही गृह मंत्रालयाशी संपर्क करुन रेजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत विचारणा केली होती. आमची मागणी मान्य केली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. इन्फोसिसचे संस्थापक आणि चेयरमॅन एन. आर. नारायणमूर्ती यांच्या प्तनी सुधा मुर्ती संस्थेच्या अध्यक्ष आहेत.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें