AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे स्टेशन ते बॉलिवूड, ‘वायरल गायिका’ रेणू मंडलला पहिल्या गाण्यासाठी तब्बल ‘इतकं’ मानधन

हिमेश रेशमियाने रेणू मंडलला तेरी मेरी कहानी या गाण्यासाठी सहा ते सात लाख रुपयांचं मानधन दिल्याची चर्चा आहे. मात्र बॉलिवूडमध्ये ब्रेक दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत रेणूने ते पैसे नाकारल्याचं म्हटलं जातं.

रेल्वे स्टेशन ते बॉलिवूड, 'वायरल गायिका' रेणू मंडलला पहिल्या गाण्यासाठी तब्बल 'इतकं' मानधन
| Updated on: Aug 27, 2019 | 10:49 AM
Share

मुंबई : नशिब आणि प्रतिभेच्या जोरावर एखादी व्यक्ती कुठून कुठे पोहचेल, सांगता येत नाही. पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानकावर गाणं गातानाचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर सुरेल गळ्याच्या रेणू मंडल (Renu Mandal) चं नशीबही चमकलं आहे. रेणूसाठी बॉलिवूडची कवाडं उघडी झाली असून पहिल्याच गाण्यासाठी तिला लाखो रुपयांचं मानधन मिळाल्याची चर्चा आहे.

प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने (Himesh Reshammiya) रेनू मंडलला आपल्या चित्रपटात ब्रेक दिला आहे. काहीच दिवसांपूर्वी तिच्या आवाजातील ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं रिलीज झालं, आणि बघता बघता सोशल मीडियावर वायरलही झालं. ‘हॅप्पी, हार्डी अँड हीर’ या चित्रपटासाठी त्याने रेणूकडून हे गाणं गाऊन घेतलं आहे.

हिमेश रेशमियाने या गाण्यासाठी रेणूला सहा ते सात लाख रुपयांचं मानधन दिल्याची चर्चा आहे. याबद्दल अधिकृत माहिती नसली, तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये रेणूला सहा लाख रुपये मिळाल्याचा उल्लेख आहे.

रेणूची कृतज्ञता

विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही रेणूने मानधनापोटी मिळालेली रक्कम स्वीकारली नव्हती. आपल्याला मिळालेल्या संधीबाबत कृतज्ञता दाखवत तिने हिमेश रेशमियांना स्पष्ट नकार दिला. मात्र रेशमिया यांनी तिला तिच्याच भविष्याची तरतूद म्हणून जबरदस्ती ही रक्कम देऊ केल्याचं म्हटलं जातं.

वृद्धेच्या सुरेल आवाजातील ‘एक प्यार का नगमा’ वायरल, 50 हजार जणांकडून शेअर

सुपरस्टारकडून संधी

रेणूला यापुढे आणखी दोन गाणी मिळण्याची शक्यता आहे. ही संधी देणाऱ्या व्यक्ती कोणी साध्यासुध्या नसून बॉलिवूडचे दोन सुपरस्टार आहेत. सलमान खानने रेणूला आपल्या आगामी चित्रपटात पार्श्वगायनाची संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर अक्षय कुमारही रेणूकडून एक गाणं गाऊन घेऊ शकतो.

लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे नाव

‘एक प्यार का नगमा है’ (Ek Pyar Ka Nagma Hai) या गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेल्या मूळ गाण्याचं गोड वर्जन जुलै महिन्याच्या अखेरीस सोशल मीडियावर ऐकायला मिळत होतं. पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर रेणूने गायलेलं हे गाणं वायरल झालं होतं. त्यावेळी तिचं नाव-गावही कोणाला माहित नव्हतं.

‘बारपेटा टाऊन- द प्लेस ऑफ पीस’ (BarpetaTown The place of peace) या फेसबुक पेजवरुन दोन मिनिटं 12 सेकंदांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या मूळ व्हिडीवरील गाण्याला 50 लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. या पेजवरुन रेणूने गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणंही शेअर करण्यात आलं होतं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...