AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही सैनिक, देशसेवा आमच्या रक्तात, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात निवृत्त लष्करी जवानांसह होमगार्डही रस्त्यावर

सध्या कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांवर अधिक ताण पडत (Retired home guard and Military man help Police) आहे.

आम्ही सैनिक, देशसेवा आमच्या रक्तात, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात निवृत्त लष्करी जवानांसह होमगार्डही रस्त्यावर
| Updated on: May 04, 2020 | 5:11 PM
Share

नाशिक : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत (Retired home guard and Military man help Police) आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या लढाईत अदृश्य शत्रू असलेल्या कोरोना युद्धात अनेक जण उतरले आहेत. कोरोनाला देशातून हद्दपार करणे हे या सर्वांचे ध्येय आहे. या युद्धात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्डही रस्त्यावर उतरले आहेत.

मनमाडमध्ये कोरोना विरुद्धच्या या लढ्यात जवळपास 30 जवान आणि 35 होमगार्ड (Retired home guard and Military man help Police) पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे याबद्दल ते कोणताही मोबदला घेत नाहीत.

“आम्ही सैनिक आहोत, देशसेवा ही आमच्या रक्तात आहे. देशासह मनमाड शहरावर कोरोनाचे संकट आल्यावर घरात कसं बसणार,” अशी भावना हे सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्ड व्यक्त करत आहेत.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांवर अधिक ताण पडत आहे. त्यातही पोलिसांची संख्या कमी असल्याने आम्ही त्यांच्या मदतीला उतरलो, असे माजी सैनिक आणि होमगार्ड यांनी सांगितलं.

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तर त्याचे महाराष्ट्रात ही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वत्र लॉकडाऊन लागू करुन देखील रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच

राज्यात काल (3 मे) कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या 12 हजार 974 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). काल दिवसभरात 115 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 2115 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 10 हजार 311 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Retired home guard and Military man help Police) दिली.

संबंधित बातम्या : 

नागपूरवासियांना दिलासा, रविवारी एकही नवा कोरोनाग्रस्त नाही, 193 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

मध्य भारतातील पहिलं कोविड रुग्णालय नागपुरात, कोरोना रुग्णांना मोठा आधार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.