Rhea Chakraborty | रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आज सुट्टी जाहीर केली

Rhea Chakraborty | रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई हायकोर्टाला सुट्टी मिळाल्याने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. न्यायालयाने मंगळवारी (22 सप्टेंबर) रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रिया आणि शौविकचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. (Rhea Chakraborty bail hearing pushed to tomorrow due to Mumbai rain)

रिया आणि शौविक या दोघांच्या जामीन अर्जावर बुधवारी (23 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आज सुट्टी जाहीर केली आहे. न्यायालयाला सुट्टी जाहीर झाल्याने रियाच्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी टळली असून, ती उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

रिया चक्रवर्तीने आपल्या जामीन अर्जात सुशांत सिंह राजपूतने ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी आपला वापर केल्याचा आरोप केला आहे. एनसीबीच्या पुराव्यांनुसार सुशांतने माझा आणि भाऊ शौविकचा ड्रग्जसाठी वापर केल्याचे स्पष्ट होत असल्याचे रियाने आपल्या याचिकेत म्हटले आहे. आम्हीच नव्हे तर, सुशांतने त्याच्या इतर जवळच्या माणसांचाही केवळ ड्रग्जसाठीच वापर केल्याचा आरोप रिया चक्रवर्तीने केला आहे.

रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी मंगळवारी (22 सप्टेंबर) संपणार होती. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक करुन तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. पोलीस कोठडीऐवजी रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. रियाने ड्रग्ज देवाण-घेवाणीत आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यावर एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. (Rhea Chakraborty bail hearing pushed to tomorrow due to Mumbai rain)

अमली पदार्थ विकत घेणे, त्यासंदर्भात अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचे ‘एनसीबी’ने म्हटले आहे. या संदर्भात एनसीबीचे पथक रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शौविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, राहील विश्राम, कैझान इब्राहिमसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली होती. त्यापैकी शौविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही एनसीबीकडून तपास सुरू आहे.

एनसीबी जसजशी खोलवर तपास करत आहे, तसतसे बडे मासे हाती लागताना दिसत आहेत. क्वीनचा निर्माता मधु मांटनेलाही एनसीबीनं चौकशीसाठी समन्स बजावलंय. सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया शाहनं एनसीबीच्या चौकशीत मधु मांटेनाचं नाव घेतलंय. एनसीबी च्या ताज्या चौकशीबद्दल जर बोलायचं झालं तर जया शाह, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, क्वॉन कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे. जया शाहची सोमवारीही 5 तास कसून चौकशी झाली आहे.

संबंधित बातम्या :

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स

रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ!

(Rhea Chakraborty bail hearing pushed to tomorrow due to Mumbai rain)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI