AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून वडिलांसाठी अवयवदान करता आलं नाही, केबीसीमध्ये रितेश भावूक

अभिनेता रितेश देशमुख यानं वडील विलासराव देशमुख यांच्यासाठी अवयवदान न करता आल्याबद्दल खंत व्यक्त केली. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात अवयदान उपक्रमासंदर्भात रितेश भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

...म्हणून वडिलांसाठी अवयवदान करता आलं नाही, केबीसीमध्ये रितेश भावूक
| Updated on: Oct 10, 2020 | 9:31 PM
Share

मुंबई: अभिनेता रितेश देशमुख यानं वडील विलासराव देशमुख यांच्यासाठी अवयवदान न करता आल्याबद्दल खंत व्यक्त केली. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात अवयदान उपक्रमासंदर्भात रितेश भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देणारे मोहन फाऊंडेशनचे डॉ.सुनील श्रॉफ यांच्यासह रितेश देशमुख सहभागी झाला होता. या कार्यक्रमात रितेशने अवयवदानाबद्दल मत व्यक्त केलं. (Ritesh Deshmukh told in KBC why he didnot donate organ for his father Vilasrao Deshmukh)

काही गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. वडील विलासराव देशमुख यांच्यावर लिव्हर ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया करणं गरजेचे आहे, असं डॉक्टरांनी सांगितले होते. शस्त्रक्रियेसाठी लिव्हर सहज उपलब्ध होईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, ते उपलब्ध झालं नाही. यामुळे वडिलांसाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला पण वैद्यकीय अडचणींमुळे ते शक्य झालं, अशी खंत रितेशनं व्यक्त केली.

नागरिकांनी अवयवदानासाठी पुढं यावं

अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची ट्रांसप्लांट शस्त्रक्रियेसाठी यादी बनवली जाते. ज्या रुग्णांची प्रकृती अतिसवेंदनशील असते त्यांना ट्रांसप्लांट शस्त्रक्रियेत प्राथमिकता दिली जाते. जास्त रुग्णांना अवयवांची गरज असते त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन अवयवदान केलं पाहीजे, असं रितेश देशमुखनं म्हटलं.

दरम्यान, कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी देखील अवयवदानाविषयी भाष्य केलं. अवयवदान चळवळीचं समर्थन करतो. पत्नी जया बच्चन आणि स्वत: डोळे दानचा निर्णय घेतल्याचं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ

Exclusive : ‘बागी-3’ चित्रपटात रितेशच्या भूमिकेचं वेगळेपण काय? रितेश देशमुखसोबत खास बातचीत

Shantabai Pawar EXCLUSIVE | मर्दानी आजीबाईंच्या थरारक कसरती, रितेश देशमुखकडून दखल

(Ritesh Deshmukh told in KBC why he didnot donate organ for his father Vilasrao Deshmukh)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.