दमदार डायलॉग, धडाकेबाज अॅक्शन, सलमानच्या ‘भारत’चा टीझर लॉन्च

दमदार डायलॉग, धडाकेबाज अॅक्शन, सलमानच्या 'भारत'चा टीझर लॉन्च


मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी ‘भारत’ (Bharat) सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. 1 मिनिट 26 सेकंद एवढ्या अवधीच्या या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि धडाकेबाज अॅक्शन सीन दिसून येतात. त्यामुळे सलमानच्या आधीच्या भूमिकांना साजेशी असेच एकंदरीत सीन याही सिनेमात असतील, यात शंका नाही.

‘भारत’ असे सलमान खानच्या व्यक्तिरेखेचं नाव या सिनेमात असून, त्याने आडनाव का लावलं नाही, याबाद्दल टीझरमध्ये सलमान काही संवादांमधून समाजवून सांगतो. कुठल्यातरी सर्कसमध्ये बाईकवरुन आगीतून सलमान खानची एन्ट्री होते. सलमान खानने ट्वीटर-फेसबुकवरुन हा टीझर शेअर केला आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये टीझरने यूट्यूबवर लाखोंचा टप्पा पार केला आहे.

”अक्सर लोग मुझसे पूछते हैं कि मेरा सरनेम क्या है, जाति क्या है, धर्म क्या है… और मैं उनसे मुस्कुरा कर कहता हूं कि इस देश के नाम पर मेरे बाबूजी ने मेरा नाम भारत रखा. अब इतने बड़े नाम के आगे जाति, धर्म, सरनेम लगाकर न तो अपना न ही, इस देश का मान कम कर सकता हूं.” या सलमानच्या डायलॉगने टीझरची सुरुवात होते. त्यावेळी सलमान खान बाईकवरुन स्टंट करत असतो. एकंदरीतच या सिनेमात स्टंट, डायलॉगचा तडका असेल, यात शंका नाही.

अली अब्बास जफर हे ‘भारत’ सिनेमाचे दिग्दर्शक असून, अभिनेत्री कतरिना कैफ, दिशा पटानी आणि सुनील ग्रोव्हर हेही यात दिसणार आहेत. ‘भारत’ सिनेमा 2019 च्या म्हणजे यंदा ईदला रिलीज होणार आहे. खूप महिन्यांपासून या सिनेमाची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे टीझरवर सलमानच्या चाहत्यांनी अक्षरश: उड्या मारल्या आहेत. आता सिनेमाच्या ट्रेलरची वाट चाहते पाहत आहेत.

VIDEO : ‘भारत’ सिनेमाचा ट्रेलर :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI