BREAKING : मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार; मुख्यमंत्री आणि संभाजीराजेंची चर्चा सकारात्मक

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सरकारच्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केले.

BREAKING : मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार; मुख्यमंत्री आणि संभाजीराजेंची चर्चा सकारात्मक
संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 10:07 PM

मुंबई: मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. तोपर्यंत वाट पाहण्यास आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे (mp sambhaji raje) यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे यांच्यात बुधवारी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मराठा समाजातील नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सरकारच्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच आम्ही आणखी काही काळ वाट पाहायला तयार असल्याचे संकेत दिले. (sambhaji raje on Maratha reservation meeting with cm uddhav Thackeray)

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सकल मराठा समाजाच्या प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा झाली. आमच्या अनेक मागण्या होत्या. परंतु, आजच्या बैठकीत दोन प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. यापैकी पहिली मागणी ही सुपरन्युमरी पद्धतीने नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला जास्तीत जास्त जागा कशा देता येतील, अशी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी सकारात्मक दिसून आले.

मात्र, त्यांनी एवढेच सांगितले की, सामाजिक आणि आर्थिक प्रवर्गातंर्गत (एसईबीसी) देण्यात आलेला आरक्षणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून सरकार काळजी घेत आहे. आम्ही सध्या याचा अभ्यास करत आहोत. मराठी उपसमिती उद्याच याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. मात्र, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

तसेच आता जुन्या गोष्टींचा विचार करण्यात अर्थ नाही. सरकार सकारात्मक असल्यानंतर आम्ही नकारात्मक भूमिका घेणे चुकीचे ठरेल. त्यामुळे आम्ही राज्य सरकारच्या आश्वासनाकडे सकारात्मकपणे पाहत आहोत. परिणामी मराठा आरक्षणासाठी आम्ही सरकारला निर्णय घेण्यासाठी आणखी काही वेळ देऊ. आम्ही तोपर्यंत वाट पाहू, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

आंदोलनासाठी मराठा समाज आक्रमक

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून येत्या 8 डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाची गेल्या आठवड्यात 29 नोव्हेंबर रोजी निर्णायक बैठक पार पडली होती. या बैठकीत 8 डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

इतर बातम्या –

Ashok Chavan | मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना : अशोक चव्हाण

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

‘देवेंद्र फडणवीसांच्या हातात सत्ता द्या’; उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली: दरेकर

(sambhaji raje on Maratha reservation meeting with cm uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.