AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंकडे इटली-अमेरिकेपेक्षा अधिक दूरदृष्टी, ठाकरेंकडे पाहूनच मोदींचा ‘तो’ निर्णय : संजय काकडे

"कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिका, इटली, फ्रान्स आणि चीन या देशांच्या तुलनेने भारतामध्ये आणि राज्यात कमी आहे", असं भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडे इटली-अमेरिकेपेक्षा अधिक दूरदृष्टी, ठाकरेंकडे पाहूनच मोदींचा 'तो' निर्णय : संजय काकडे
| Updated on: Apr 06, 2020 | 8:32 PM
Share

पुणे  : “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन (Sanjay Kakade on Corona Virus) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केलं”, असं भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे म्हणाले. संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामांचे कौतुक केले. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले (Sanjay Kakade on Corona Virus).

“कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देशात सर्वप्रथम राज्यात संचारबंदी जाहीर केली. राज्यात 23 मार्चला संचारबंदी जाहीर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 मार्चला देशभरात संचारबंदी जाहीर केली. इटलीचे पंतप्रधान गिसीपी काँट आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिक दूरदृष्टी आहे”, असे संजय काकडे म्हणाले.

“कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिका, इटली, फ्रान्स आणि चीन या देशांच्या तुलनेने भारतामध्ये आणि राज्यात कमी आहे. देशात 136 कोटी आणि राज्यात 13 कोटी लोकसंख्या आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतात प्रादुर्भाव कमी आहे”, असं संजय काकडे यांनी सांगितले.

“लॉकडाऊननंतर आर्थिक मंदीची लाट येणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र त्यातून भारत लवकरच बाहेर पडेल. फक्त नागरिकांनी सरकारच्या सूचनेचे पालन करायला हवं”, असेही काकडे म्हणाले.

देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 500 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Corona Patient In Maharashtra) आहे. आज (6 एप्रिल) मुंबई, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी नवी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज 48 रुग्ण आढळले असून यात 40 रुग्ण हे मुंबईचे आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 796 वर पोहोचली आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 498 झाला (Corona Patient In Maharashtra) आहे. मुंबईसह उपनगरात आज (6 एप्रिल) दिवसभरात अंधेरी, मुंबई सेंट्रल, दादर या परिसरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. यात दादरमध्ये एका 54 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेला हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर वॉकहार्ट रुग्णालयातील 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय अंधेरीतील एका कुटुंबातील 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

संंबंधित बातम्या :

राज्यातील मृतांचा आकडा अपेक्षेपेक्षा जास्त, राजेश टोपेंच्या माहितीने धाकधूक वाढली

नागपूरकरांना तुमच्याकडून आशा, तुम्ही आजारी पडू नका, तुकाराम मुंढेंचा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रेमळ सल्ला

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.