AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरकरांना तुमच्याकडून आशा, तुम्ही आजारी पडू नका, तुकाराम मुंंढेंचा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रेमळ सल्ला

"30 लाख नागपूरकरांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या", असा प्रेमळ सल्ला नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

नागपूरकरांना तुमच्याकडून आशा, तुम्ही आजारी पडू नका, तुकाराम मुंंढेंचा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रेमळ सल्ला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 06, 2020 | 7:01 PM
Share

नागपूर : “30 लाख नागपूरकरांची काळजी (Tukaram Mundhe advice to Health Workers) तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या”, असा प्रेमळ सल्ला नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला. नागपुरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची तुकाराम मुंढे यांनी भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला (Tukaram Mundhe advice to Health Workers).

आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणाला निघत असताना तुकाराम मुंढे आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तुकाराम मुंढेंना अचानक समोर बघून सारेच कर्मचारी अवाक झाले. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: त्यांच्या बसमध्ये चढून सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामाचे कौतुक करीत सर्वांशी हितगूज साधलं.

“आपल्याला आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत आहे. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला हवी. एका सीटवर एकाच महिलेने बसावं आणि सर्व निर्देशाचं पालन करावं. नागपूरकरांची आशा तुमच्यावर आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं आहे”, असं कर्मचाऱ्यांशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले.

यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागांचाही दौरा केला. यात त्यांना जिथे लोकं एकत्र गर्दी करुन दिसली तिथे गाडीतून उतरुन त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे धडे दिले. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

तुकाराम मुंढे यांनी आज सकाळीच शहर पालथे घातलं. मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी असल्याचं दिसलं. तिथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे लक्षात येताच ते स्वत: पोहोचले. सर्वांना तीन-तीन फुटाच्या अंतरावर उभं करुन सामाजिक अंतराचं पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केलं. यावेळी त्यांनी राशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटावर खुणा करण्यास सांगितलं.

अनेकांना आश्चर्याचा धक्का

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपा आयुक्त मुंढे स्वत: शहरात फिरत असल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. गर्दी असलेल्या ठिकाणी गाडी थांबल्याचे बघताच आणि त्यातून येणारा व्यक्ती दुकानाकडे येत असल्याचं बघून अनेकांना सुरुवातीला काही कळलंच नाही. मात्र, दुकानात पोहोचल्यावर ते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे असल्याचं लक्षात येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

संबंधित बातमी :

Corona Update | देशात 4 हजारांवर रुग्ण, 109 मृत्यू, 25 हजार तब्लिगी क्वारंटाईन, राज्यांना 3 हजार कोटी

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...