मंदिरं उघडण्याचा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी तर नाही ना?; निरुपम यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल आठ महिन्यानंतर राज्यातील धार्मिकस्थळं उघडण्याची परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. (sanjay nirupam slams uddhav thackeray over temples reopening decision)

मंदिरं उघडण्याचा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी तर नाही ना?; निरुपम यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 1:42 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल आठ महिन्यानंतर राज्यातील धार्मिकस्थळं उघडण्याची परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं सांगत होते आणि आज त्यांनी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला. याचं आश्चर्य वाटतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी आहे की यामागे काही प्रशासकीय धोरण आहे?, असा टोला संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. (sanjay nirupam slams uddhav thackeray over temples reopening decision)

संजय निरुपम यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. धार्मिकस्थळं सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण दिवाळीनंतर कोरोनाची नवी लाट येणार असल्याचं मुख्यमंत्री कालपरवापर्यंत जोर देऊन सांगत होते आणि आज हा निर्णय घेतला? हा निर्णय आश्चर्यकारक वाटत नाही का?, असा सवाल करतानाच हा निर्णय वृत्तपत्रांच्या हेडलाइनसाठी घेतलाय की यामागे काही प्रशासकीय धोरणही आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला.

दरम्यान, मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असं सांगत यापुढेही शिस्तीचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या:

हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले

Diwali 2020: भारतासह ‘या’ 10 देशांमध्ये मोठ्या उत्सहात साजरी होते दिवाळी, वाचून आश्चर्य वाटेल

ही ‘श्रीं’ची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट!

(sanjay nirupam slams uddhav thackeray over temples reopening decision)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.