AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress Leader : पन्नाशी उलटली तरी सतेज पाटील राज्यमंत्रीच का? काँग्रेस बंटींचे नेतृत्व कधी मान्य करणार…

सतेज पाटील तरुण दिसतात त्याचा अर्थ असा नाही की त्यांची अजून चाळीशीही झाली नाही, पण बंटी पाटलांनी आता पन्नाशी गाठली आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट कधी मिळणार आणि सतेज पाटीलसारख्या नेत्याला काँग्रेस ताकद कधी देणार असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Congress Leader : पन्नाशी उलटली तरी सतेज पाटील राज्यमंत्रीच का? काँग्रेस बंटींचे नेतृत्व कधी मान्य करणार...
काँग्रेस सतेज पाटील यांचे नेतृत्व कधी मान्य करणार ?Image Credit source: TV9
| Updated on: Apr 16, 2022 | 8:09 PM
Share

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) एका सभेत बोलताना राज्यमंत्री सतेज पाटील (Minister of State Satej Patil) यांच्या राज्यमंत्री पदाविषयी बोलताना म्हणतात की, वयाची 50 उलटली तरीही अजून सतेज पाटलांना काँग्रेसकडून राज्यमंत्रीच का ठेवले जाते? असा सवाल त्यांनी भर सभेत केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या राज्यमंत्री आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी राबवलेल्या नव्या नेतृत्वाचीही संकल्पना त्यांनी सांगितली होती. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना बंटी पाटीलसाहेब आता कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे अशी भावना ते व्यक्त करत आहेत. आणि त्यात वावगं असं काहीच नाही.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मंत्री सतेज पाटील चर्चेत आले आहेत, कारण काही दिवसापूर्वी देशातील झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे वारे असतानाही सतेज उर्फ बंटी यांनी कोल्हापुरातून विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध केली होती, तेही आपल्या स्वतःच्या नेतृत्वावर.

जनाधार लाभलेलं नेतृत्व

विधानसभेवर जे काँग्रेसचे जे 44 आमदार आहेत, त्यापैकी 4 आमदार हे कोल्हापुरातून निवडून आले आहेत, त्यापैकी चार पैकी चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागली, त्यातही बंटी पाटलांनी आपले टेक्निक वापरुन पुन्हा एकदा काँग्रेसचाच उमेदवार म्हणजेच जयश्री जाधव यांना निवडून आणले आहे. तरीही काँग्रेसकडून जनाधार लाभलेल्या नेत्याला पक्षाकडून पाठबळ मिळत नसेल तर काँग्रेस पुन्हा वाढणार का हाच सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सतेज पाटील नावाचेच टेक्निक

देशात 2019 नंतर जोरदारपणे भाजपचे वारे वाहू लागले, त्या काळानंतरही सतेज पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन कोल्हापुरातून एक नाही दोन नाही तर काँग्रेसच्या तिकिटावर 4 आमदार निवडून आणले. तेही स्वतःच्या हिम्मतीवर. आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांना निवडून आणण्या पाठीमागे सतेज पाटील नावाचेच टेक्निक आहे. मात्र याकडे काँग्रेस पक्ष कधी लक्ष देणार हाही सवाल आहे.

बंटी म्हणजे काँग्रेसचं बळ

कोल्हापूर जिल्ह्यात 2019 नंतर जेवढ्या काही निवडणुका झाल्या आहेत, त्या एकाही निवडणुकीत सतेज पाटील यांनी विजय साजरा केला नाही असं झालं नाही. ज्या ज्या निवडणुकीत बंटी पाटलांनी आपलं टेक्निक वापरलं आहे, त्या त्या निवडणुकीत विजयाची पतका काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे. गोकुळ दूध संघ असो, जिल्हा बँक असो किंवा विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून जाणं असो बंटी पाटलांनी एकहाती सत्ता सांभाळली आहे, आणि कोल्हापूर आणि परिसरात काँग्रेस बळकट करण्यासाठीच त्यांनी प्रयत्न केले आहेत. तरीही सतेज पाटील यांना काँग्रेसकडून फक्त राज्यमंत्री पदच बहाल करण्यात आले आहे.

मोदी लाटेतही चालतं ते बंटीचच

राजकारणात 2014 नंतर देशात सगळीकडे भाजपमय वातावरण असताना, आणि राज्यात भाजप-युतीचं सरकार असतानाही मंत्री सतेज पाटील यांनी मात्र कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची युती करुन महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली. बंटी पाटलांकडून काँग्रेसमध्ये बळकटी आणण्यासाठी त्यांनी कसूर सोडला नाही. विशेषतः 2014 नंतर देशात आणि राज्यात भाजप आणि मोदी लाट असतानाही त्यांनी एका पाठोपाठ एक यश मिळवले आहे, आणि काँग्रेस जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात बळकट केले आहे. त्यामुळेच अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

कोल्हापूर भाजपमुक्त

महाराष्ट्रातील विधानसभेवर जे 44 आमदार आहेत त्यातील 4 आमदार हे एका कोल्हापुरातून त्यांनी निवडून आणले आहेत. त्यात सतेज पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर काँग्रेस बळकट करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न बंटी पाटलांकडून कधीच सुटले नाहीत. म्हणूनच आज कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त आहे, तो भाजपमुक्त केला आहे तो काँग्रेसचे मंत्रा सतेज पाटील यांनीच.

पुन्हा एकदा नेतृत्व झळाळून निघाले

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीने सतेज पाटील यांचे नेतृत्व पुन्हा एकदा झळाळून निघाले आहे. 2019 मध्ये सतेज पाटील यांनीच काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले आहेत. त्यामध्येच आता निवडून आलेल्या जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव यांचा समावेश होता. मात्र कोरोना काळात त्यांचे निधन झाले आणि आता पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीच्या लढतीत सतेज पाटील यांनी कोल्हापुरचा गड एकट्याच्या जीवावर राखला आहे. तरीही काँग्रेसकडून जनाधार लाभलेल्या नेत्याचा विचार केला जात नसेल, त्यांचे नेतृत्व फक्त कोल्हापूरतेच मर्यादित ठेवले जात असेल तर पक्षासाठी आणखी काय मिळवायला पाहिजे असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला तर त्यात वावगे ते काय असणार आहे.

तरुण नेत्याने पन्नाशी गाठली

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस सगळ्यात बळकट कुठे असेल तर ते म्हणजे कोल्हापुरात आहे. कारण सतेज पाटील एका एका कार्यकर्त्यासाठी नेहमीच लढत आले आहेत, आणि काँग्रेसचा हात जनसामान्यांच्या हातात देत आहेत. सतेज पाटील तरुण दिसतात त्याचा अर्थ असा नाही की त्यांची अजून चाळीशीही झाली नाही, पण बंटी पाटलांनी आता पन्नाशी गाठली आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट कधी मिळणार आणि सतेज पाटीलसारख्या नेत्याला काँग्रेस ताकद कधी देणार असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या

Kolhapur North By Election Result 2022: चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी? कोल्हापूर उत्तरच्या पराभवानंतर चर्चा तर सुरु

Kolhapur North By Election : कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट! 2019 पासूनचं गणित काय सांगतं?

Kolhapur North By Election 2022: कोल्हापुरात शिवसेनेची मतं खरंच काँग्रेसच्या जयश्री जाधवांना पडली? पडलेल्या मतांचं गणित समजून घ्या !

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....