‘लॉकडाऊनमुळे कोरोना रोखणं अशक्य, लस म्हणून मास्क वापरा’

कोरोनाची लस समजून मास्क वापरा असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी म्हटलं आहे.

'लॉकडाऊनमुळे कोरोना रोखणं अशक्य, लस म्हणून मास्क वापरा'
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 11:50 AM

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून देश लॉकडाऊन आहे. या जीवघेण्या संसर्गाचा धोका रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सुरू केलेलं लॉकडाऊन अजूनही सुरू आहे. पण तरीदेखील मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण समोर येत आहेत. अशात कोरोनाची लस कधी येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात लॉकडाऊनमुळे कोरोना आटोक्यात येणं अशक्य आहे. त्यामुळे कारण रोगाचा विषाणू मोठ्या प्रमाणात समाजात पसरला आहे. त्यामुळे कोरोनाची लस समजून मास्क वापरा असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी म्हटलं आहे. (satyendra jain says impossible to stop covid spread through lockdown use mask as vaccine)

दिल्लीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी रेकॉर्ड ब्रेक 5,891 प्रकरण समोर आली. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये सत्येंद्र जैन बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘सुरूवातीला लॉकडाऊन लागू करण्यात आलं कारण त्यावेळी व्हायरल नवा होता आणि त्यामुळे त्याच्या धोक्याचा कोणालाही अंदाज नव्हता.’

ते पुढे म्हणाले की, ‘लॉकडाऊनमधून बरंच काही शिकायला मिळालं. 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर विषाणूचा प्रसार थांबेल असं अनेकजण म्हणत होते. पण संसर्ग थांबला का? म्हणूनच, लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार थांबवणं अशक्य आहे. कारण हा विषाणू समाजात पसरला आहे. ”

इतकंच नाही तर, ‘लॉकडाऊनचा आणखी एक धडा म्हणजे मास्कचा वापर. कोरोनाच्या संक्रमणाचा प्रसार कमी करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. ‘खरी लस येईपर्यंत लोकांनी लस म्हणून मास्कच वापरावं. काही महिन्यांत लस मिळेल अशी अपेक्षा आहे.’ असंही जैन म्हणाले.

दरम्यान, शहरात मोठ्या संख्येने धोका वाढत असताना नागरिक मात्र निष्काळजी करताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरत नाहीत. त्यामुळे मास्क न घातल्यास कडक कारवाई करत दंड आकारला जाईल असा इशारा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिला.

इतर बातम्या – 

मराठा क्रांती मोर्चा महामुंबईचा उद्या मुंबईत एल्गार, लालबाग ते ठाणे संघर्ष यात्रा

मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

(satyendra jain says impossible to stop covid spread through lockdown use mask as vaccine)

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.