जेव्हा चंद्रशेखर आझाद यांना सावरकरांनी जिनांची सुपारी दिलेली!

चंद्रशेखर आझाद उर्फ भैय्या हे लाहोर कटाचा खटला चालवणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या विचारात होते. यशपाल आणि त्यांच्या साथीदारांनी सांगितलं की, व्हॉईसरॉयला गोळी मारल्यास त्याचे पडसाद दूरवर पडतील. चंद्रशेखर आझाद या सूचनेशी सहमत झाले, मात्र त्यांची संघटना आर्थिक अडचणींशी झुंजत होती आणि कुठलेही काम पैशांविना पूर्ण होणार नव्हते. सर्व क्रांतिकारकांनी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. यशपाल आणि […]

जेव्हा चंद्रशेखर आझाद यांना सावरकरांनी जिनांची सुपारी दिलेली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

चंद्रशेखर आझाद उर्फ भैय्या हे लाहोर कटाचा खटला चालवणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या विचारात होते. यशपाल आणि त्यांच्या साथीदारांनी सांगितलं की, व्हॉईसरॉयला गोळी मारल्यास त्याचे पडसाद दूरवर पडतील. चंद्रशेखर आझाद या सूचनेशी सहमत झाले, मात्र त्यांची संघटना आर्थिक अडचणींशी झुंजत होती आणि कुठलेही काम पैशांविना पूर्ण होणार नव्हते.

सर्व क्रांतिकारकांनी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. यशपाल आणि त्यांचे साथीदार भगवती यांनी याचदरम्यान दिल्लीत विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे भाऊ बाबा सावरकर यांच्याशी बातचीत केली. हे तेव्हाचे दिवस होते, ज्यावेळी सावरकर बंधू हिंदू महासभेत सक्रीय झाले होते. यशपाल यांनी बाबा सावरकर यांना आपल्या संघटनेची योजना सांगितली. त्यानंतर बाबा सावरकर यांनी यशपाल यांना महाराष्ट्रात येऊन भेटण्यास सांगितले.

काही दिवसांनंतर यशपला हे महाराष्ट्रातील अकोला येथील एका घरात बाबा सावरकर यांना भेटले. डिसेंबरचा महिना होता. ऐन हिवाळ्यात बाबा सर्दीमुळे त्रस्त होते. अत्यंत साधं घर होतं. यशपाल यांचं बाबा यांनी मानानं स्वागत केलं.

यशपाल यांनी बाबा यांच्यासोबत खूप वेळ घालवला. सावरकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन काही मुलं तिथे आली होती आणि ते फुटबॉलवर चर्चा करत होते, असे यशपालना तिथे दिसले. मराठीमध्ये चर्चा करणारीही ही मुलं सेंटर, फॉरवर्ड, बॅक, गोल अशा इंग्रजी शब्दांचा वापर करत नव्हते. तर त्याजागी पर्यायी संस्कृत शब्दांचा वापर केला जात होता. त्या मुलांचा पर्यायी शब्द वापरण्याचा प्रयत्न यशपाल यांना भावला, मात्र काहीसा विचित्रही वाटला. असो.

वेळ मिळताच यशपाल यांनी बाबा सावरकरांना आपल्या योजनेबद्दल पुन्हा एकदा सांगितले आणि त्याचसोबत साधनांच्या कमतरतेबाबतही सांगितले. बाबा सावरकर यांनी यशपाल यांच्या योजनेशी असहमती दर्शवली नाही, मात्र ते म्हणाले, “इंग्रजांसह देशात आणखी एक आपला राष्ट्रीय शत्रू आहे, जो आपल्या राष्ट्रीय एकतेच्या विरोधात आहे आणि तो इंग्रजांच्या गोटात जाऊन आपल्या स्वातंत्र्यांच्या प्रयत्नांना अयशस्वी करतो.”

बाबा सावरकर यांचा इशार मुस्लिमांकडे होता. यशपाल आणि त्यांच्या साथीदारांना आपल्या बाजूने करण्याच्या उद्देशाने ते पुढे म्हणाले, “परदेशी गुलामीच्या विरुद्ध आपण आपल्या सांस्कृतिक एकता आणि शक्तीच्या जोरावरच लढून स्वतंत्र होऊ शकतो. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला सांस्कृतिक शक्ती आणि एकता प्रस्थापित करण्यासाठी शत्रूंपासून स्वतंत्र व्हावं लागेल. त्यामुळे केवळ इंग्रजांशी लढणं म्हणजे गुलामीच्या झाडाच्या मुळांना तोडण्याऐवजी केवळ पानं कापण्यासारखे आहे. आम्हाला तुमच्या योजना आणि उद्देशाबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे. मात्र, सहकार्य तेव्हाच करु शकतो, ज्यावेळी या योजनेता एकता असेल.”

यशपाल शांतपणे बाबा सावरकर यांचे ऐकत होते. त्यानंतर बाबा यांनी आपली योजना अधिक स्पष्टपणे सांगितली. यशपाल यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, जिना हे देशातील सर्वात घातक आहेत, असे त्यावेळी बाबा यांनी यशपाल यांना म्हटले. बाबा पुढे म्हणाले, “जर तुम्ही या (जिना) व्यक्तीला संपवत असाल, तर स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गातील मोठा अडसर दूर होईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्याची जबाबदारी घेऊ शकतो.”

यशपाल हे सावरकर बंधूंचे आदर करत असत. मात्र, त्यांनी बाबा सावरकर यांचा हा प्रस्ताव हसतमुखाने टाळलं. यशपाल यांच्या मते, चंद्रशेखर आझाद यांच्या संघटनेसाठी त्यावेळी 50 हजार रुपये ही अत्यंत मोठी रक्कम होती. तसेही राजकीय उद्देशासाठी दरोडा किंवा बनावट नाणे असा मार्ग अवलंबण्स क्रांतिकारक मागे-पुढे पाहत नव्हते. किंबहुना, दरोड्यावेळी एखादी हत्या सुद्धा होण्याची भिती असायची. शिवाय, जिना यांच्याबद्दल क्रांतिकारकांमध्ये विशेष काही सहानुभूती सुद्धा नव्हती. मात्र, धार्मिक मतभेदांमुळे जिनांची हत्या करायची, हा बाबा सावरकरांचा विचार चंद्रशेखर आझाद, यशपाल आणि त्यांच्या साथीदारांना काही पटला नाही.

त्याच संध्याकाळी यशपाल यांनी दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला. कारण बाबा सावरकर यांच्यासोबतची बातचीत त्यांना चंद्रशेखर आझाद यांना कळवायची होती.

बाबा सावरकर यांनी यशपाल यांना परतण्याआधी एक भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला. बाबा यांनी एका कपड्यातून हातभर लांब पिस्तूल काढली आणि यशपाल यांना दाखवली. यशपाल आपल्या पुस्तकात लिहितात, “शस्त्राची रचना पाहून मला लगेच कळलं की, हे शस्त्र लाहोरला बनवलं आहे. या बंदुकीत काडतुसांऐवजी नळीमध्ये दारु आणि गोळी भरावी लागत होती.”

बंदूक भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाबा सावरकर यांचे यशपाल यांनी आभार मानले. मात्र भेटवस्तू स्वीकारली नाही. यशपाल यांनी आपल्या कंबरेला अडकवलेली कोल्ट बंदूक दाखवत म्हणाले, “आम्हाला अशा शस्त्रांची गरज आहे, जे कसेही लपवता येतात.”

बाबा सावरकर निराश झाले आणि म्हणाले, “जशी तुमची इच्छा. मात्र, अशा परदेशी गोष्टी किती प्रमाणात गोळा केल्या जाऊ शकतात?”

देशी बंदुकीबाबत बाबा सावरकर यांचं प्रेम यशपाल यांना आवडलं, मात्र व्यावहारिकरित्या ते काही पटण्यासारखे नव्हते. पुढे यशपाल यांनी आपल्या साथीदारांना बाबा सावरकर यांच्या जुन्या बंदुकीचा किस्सा सांगितला, त्यावेळी साथीदारांनी बाबा सावरकरांची खूप टर खेचली.

दिल्लीला परतल्यानंतर यशपाल यांनी भगवती आणि चंद्रशेखर आझाद यांना बाबा सावरकर यांच्यासोबतच्या चर्चेचा वृत्तांत सांगितला. जिना यांना मारण्याचा प्रस्ताव ऐकून चंद्रशेखर आझाद संतापले. ते म्हणाले, “हे लोक (सावरकर) आपल्याला काय मारेकरी समजतात का?”

अर्थात, सावरकर बंधूंचा कल भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यापेक्षा मुस्लिमांपासून मुक्त करण्याकडे होता. सावरकर बंधूंकडे पैसा तर होता, मात्र त्याचा वापर करुन ते व्हॉईसरॉयऐवजी जिनांची हत्या करु पाहत होते.

पुढे हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीने दिल्लीजवळ व्हॉईसरॉयच्या ट्रेनखाली बॉम्बस्फोट घडवला, ज्यात एक व्यक्ती मारला गेला. मात्र, व्हॉईसरॉय बचावला होता.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.