50 सिरीअल बॉम्बस्फोटातील कुख्यात दहशतवादी मुंबईतून फरार

50 सिरीअल बॉम्बस्फोटातील कुख्यात दहशतवादी मुंबईतून फरार

देशभरातील अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी हा फरार झाला (jalees ansari missing) आहे.

Namrata Patil

|

Jan 17, 2020 | 12:01 AM

मुंबई : देशभरातील अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी हा फरार झाला (jalees ansari missing) आहे. जलीस अन्सारी हा अजमेर जेलमधून पॅरोलवर बाहेर आला होता. जलीस हा मुंबईतून फरार झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर महाराष्ट्र एटीएस, मुंबई क्राईम ब्रँचसह सर्व सुरक्षा एजेन्सीद्वारे अलर्ट जारी करण्यात (jalees ansari missing) आला आहे.

शुक्रवारी (17 जानेवारी) डॉ. जलीस अन्सारीचा पॅरोल संपणार होता. त्यानंतर त्याला अजमेर जेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी 5 च्या सुमारास तो बेपत्ता झाला. त्याच्यावर 1992 पासून त्याच्यावर 6 बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप होते.

कुख्यात गुंड जलीस अन्सारी याला अजेमर बॉम्बस्फोटाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जलीसचा 50 सिरीअल बॉम्बस्फोटात हात आहे. तो फरार झाल्याची तक्रार मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्र एटीएस, मुंबई क्राईम ब्रँचसह सर्व सुरक्षा एजेन्सीद्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान तो फरार झाल्याने देशावर अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जलीस अन्सारी याचे इंडियन मुजाहिद्दीन यांसह इतर दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. त्याला ‘डॉ. बॉम्ब’ या नावाने ओळखलं जातं. मालेगाव स्फोटातील तो प्रमुख आरोपी होता. देशभरातील जवळपास 50 बॉम्ब स्फोटात त्याचा हात असल्याचे बोललं जात. त्याची एन आय ए या संस्थेनीही चौकशी केली आहे.

अन्सारीचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध होते. तो अनेक दहशतवादी संघटनांना बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग द्यायचा. 1993 च्या एका बॉम्बस्फोटप्रकरणी तो अजमेरच्या जेलमध्ये बंद होता. सध्या तो पॅरोलवर बाहेर असून तो घरी आला होता.

दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग देणारा हा सर्वात मोठा आरोपी होता. मात्र तो फरार झाल्याने देशात अनेक धोके निर्माण झाले आहे. यामुळे तपास यंत्रणा कमी पडल्याचेही स्पष्ट होत (jalees ansari missing) आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें