Pandharpur Corona | आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात सात नवे रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

पंढरपुरात आज (30 जून) सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे (Corona Patient found in Pandharpur ahead of Ashadhi Ekadashi).

Pandharpur Corona | आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात सात नवे रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 9:05 AM

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. पंढरपुरात आज (30 जून) सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ऐन आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पंढरपुरात खळबळ उडाली आहे (Corona Patient found in Pandharpur ahead of Ashadhi Ekadashi).

पंढरपुरात दोन दिवसांपूर्वी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी एक रुग्ण करंबक गावातील तर दुसरा रुग्ण पंढरपुरातील होता. विशेष म्हणजे पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर कोरोवाबाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे पंढरपूर मंदिर परिसराचा बाधित भाग सील करण्यात आला (Corona Patient found in Pandharpur ahead of Ashadhi Ekadashi).

पंढरपुरात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका नामांकित बॅंकेच्या दोन संचालकांसह त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरचाही समावेश आहे. दरम्यान, पंढरपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्रशासन आणखी सतर्क झालं आहे. प्रशासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे.

हेही वाचा : आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण, प्रदक्षिणा मार्गावरील काही भाग सील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला असला तरी बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या चरणी संतांच्या पादुका अर्पण होण्याची अखंडित परंपरा कायम राहणार आहे.

सरकारकडून या वारीसाठी काही नियम देण्यात आले आहेत. बसने जाणाऱ्या संतांच्या पालख्या रस्त्यात कोठेही न थांबता पंढरपूरसाठी प्रस्थान करतील. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज आणि संत चांगावटेश्वर यांच्या पालख्या आज पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत.

प्रत्येक पालखीसोबत बसमधून केवळ वीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच पालखी रस्त्यात दर्शनासाठी थांबवता येणार नाही. पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत कोरोना टेस्ट करणं बंधनकारक आहे.

सरकारकडून प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. इन्सिडेंट कमांडर पादुका प्रस्थान केल्यापासून प्रस्थानच्या ठिकाणी पुन्हा येईपर्यंत पालखीसोबत राहणार आहे.

पालखीत साठ वर्षावरील वारकऱ्यांना मनाई आहे. बससोबत पुढे आणि मागे बंदोबस्त करणारी वाहने असणार आहेत. पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूरपासून देवस्थानापर्यंत सोबत राहणार आहेत. बस मधून जाणाऱ्या वारकर्‍यांची यादी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना पाठवणं आवश्यक आहे.

हेही वाचा : पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या, अजित पवारांच्या सूचना

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.