धक्कादायक ! पोलिसाकडूनच घटस्फोटीत महिलेवर अत्याचार, नंतर इच्छेविरुद्ध गर्भपात

महिलेवर लैंगिक अत्याचार, तसेच इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची तक्रार अहमदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. (sexual abuse woman Ahmednagar)

  • Updated On - 7:48 pm, Mon, 21 December 20
धक्कादायक ! पोलिसाकडूनच घटस्फोटीत महिलेवर अत्याचार, नंतर इच्छेविरुद्ध गर्भपात

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार, तसेच इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची तक्रार अहमदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. घारगाव येथील एका पोलीस शिपायाने जीवनसाथी डॉट कॉमवर लग्नाची मागणी घातली. त्यानंतर या पोलीस शिपायाने वारंवार लैंगिक अत्याचार केले, असा आरोप या महिलेने केला आहे. आरोपी पोलीस शिपायी मूळचा संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील असून तक्रारदार महिला मूळची सोलापूर येथील आहे. (sexual abuse of the woman in Ahmednagar)

प्रकरण काय ?

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संगमनेर येथील एका पोलीस शिपायाने जीवनसाथी डॉट कॉमवर महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तक्रारदार महिलेला दिवस गेल्याचे समजताच पोलीस शिपायाने गर्भपात करण्यासाचा अट्टहास धरला. तसेच, त्यासाठी शिपायाने महिलेला त्रास देणे सुरु केले. अखेर पोलीस शिपायाने महिलेला आळे (तालुका जुन्नर) येथे आणले.

बेकायदेशीररीत्या गर्भपात

महिलेला आळे येथे आणल्यानंतर पोलीस शिपायाने निरामय क्लिनिकमधील डॉ. विनोद मेहेर यांच्याकडून अवैधरीत्या गर्भपात घडवून आणला. गर्भपात केल्याचे समजताच या महिलेने घारगाव येथील पोलीस ठाण्यातील आरोपी पोलीस शिपायी, अकोला येथील एक महिला आणि डॉ. विनोद मेहेर यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच डॉ. विनोद मेहेर यांचा दवाखाना सील करण्यात आला. डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या तिन्ही आरोपींविरोधात अत्याचार, अ‌ॅट्रॉसिटी प्रतिंबधक कायदा, बेकायदेशीर गर्भपात, आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती पोलिस उपअधीक्षक मदने यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेचा पोलिसांकूडन तपास सुरु आहे.

संबंधित बातमी :

अयोध्येत रक्तपात, मुलीला सासरी पाठवण्यास वडिलाचा नकार, जावयाकडून तलवारीने सहा जणांवर वार

धक्कादायक… व्यसनाची सवय लावून लहान बहिणीलाच वेश्या व्यवसायात ढकलले

सांगली ते डोंबिवली, अपघात, चोरीचा थरार, सीसीटीव्हीत कैद

(sexual abuse of the woman in Ahmednagar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI